Navnit Rana: हनुमान चालिसा विरोधामुळेच उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले!

खासदार नवनीत राणा म्हणाल्या, आता ‘लव्ह जिहाद’ विरूध्द लढा देणार
Navnit Rana
Navnit RanaSarkarnama

जळगाव : हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करू न दिल्यामुळेच राज्यातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांचे सरकार पडले, ही तर सुरवात आहे. आगामी महापालिका (Municiple corporation) निवडणुकीतही त्यांना धडा मिळेल, असे मत खासदार नवनीत राणा (Navnit Rana) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. (Navnit Rana attend Hanuman chalisa chant at Jalgaon)

Navnit Rana
MVP News: नितीन ठाकरे यांनी शरद पवारांची दिशाभूल केली!

सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यासाठी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा जळगाव येथे आले होते. जळगाव येथे राणा यांच्या उपस्थितीत सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यात आले.

Navnit Rana
Ambadas Danve: अमित शहांचे मुंबईप्रेम हे बेगडी आहे

यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. त्या म्हणाल्या, त्यांना सरकार चालवता आले नाही. आम्ही जनतेला पसंत पडेल, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होईल असे काम करीत आहोत.

पत्रकारांशी बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या, की राज्याला संकटमुक्त करण्यासाठी आम्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान पठण करण्यासाठी विनंती केली होती, मात्र त्यांनी परवानगी दिली नाही, उलट आम्हाला कारागृहात टाकले.

त्या पुढे म्हणाल्या, राज्य सरकारने आमच्यावर कारवाई केली, मात्र आम्ही लढलो आणि जिंकलो, राज्यातील उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले, त्यांना आम्ही घरी बसविले. सद्या ‘लव्ह जिहाद’चा प्रश्‍न अत्यंत गंभीर आहे. आगामी काळात आम्ही त्या विरूध्द लढा देणार आहोत. त्याची सुरूवात आपण जळगाव येथून करणार आहोत. सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्याअगोदर जळगावात राणा दांपत्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in