Cantonment Elections: शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसेंची पहिली अग्नीपरीक्षा!

गोडसेंचे होमटाऊन देवळालीच्या निवडणुकीत ठाकरे गट पुर्ण ताकदीनिशी उतरणार
Hemant Godse & Vijay Karanjkar
Hemant Godse & Vijay Karanjkar Sarkarnama

Nashik News: बंडखोरी करून शिंदे गटात (Eknath Shinde) गेलेले खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचे देवळाली कॅन्टोनमेंट हे होमटाऊन आहे. गोडसे यांनी पक्ष सोडला तरीही बहुसंख्या नेते, कार्यकर्ते मात्र ठाकरे गटातच (Uddhav Thackeray) राहिले. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत ठाकरे गट (Shivsena) पुर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. त्यांची लढत सत्ताधारी भाजपशी (BJP) आहे. अशा स्थितीत शिंदे गटाचे काय होणार? हा प्रश्न आहे. त्यात खासदार गोडसे यांची ती अग्नीपरीक्षाच ठरेल. (Cantonment Board election will be the first political acid test for Hemant Godse)

एप्रिल महिनाअखेरीस देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणूक होत आहे. येथे आठ जागा आहेत. भारतीय जनता पक्षाकडे पुर्ण बहुमत असून सध्या भाजपच्या प्रीतम आढाव या शासन नियुक्त उपाध्यक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाने गेल्या निवडणुकीत येथे पहिल्यांदाच बाजी मारली होती. यंदाच्या निवडणुकीत देखील त्यांनी जोरात तयारी केलेली आहे. त्यांची लढत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी असेल.

Hemant Godse & Vijay Karanjkar
Amruta Pawar News: `राष्ट्रवादी`ला धक्का...मतांचा विक्रम करणाऱ्या अमृता पवार यांचा भाजप प्रवेश?

खासदार हेमंत गोडसे यांचे मुळगाव संसरी अर्थात देवळाली आहे. त्यामुळे आपल्या घरच्या निवडणुकीत त्यांची भूमिका व स्थान काय असणार याला राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. भाजप त्यांच्याशी युती करणार काय?. युती केल्यास गोडसे यांच्या शिंदे गटाला सन्मानजनक जागा मिळणार का?. की खासदार गोडसे स्वबळावर निवडणूक लढणार असे विविध प्रश्न आहेत. त्याता त्यांना सन्मानजक जागा मिळणे आवश्यक आहे. एका दृष्टीने ही निवडणूक त्यांची राजकीय परिक्षाअसेल.

या निवडणुकीत ठाकरे गट संपूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. त्याअनुषंगाने शिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास प्रारंभ झाला. इच्छुकांची गर्दी लक्षात घेता शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.

Hemant Godse & Vijay Karanjkar
Gopichand Padalkar News; मेंढपाळांसाठी ठोस तरतुद असलेला पहिला अर्थसंकल्प

शिवसेना भवनमध्ये इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. उपनेते बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, सचिन मराठे , महेश बडवे, देवळालीचे शहरप्रमुख साहेबराव चौधरी यांनी मुलाखत घेतल्या. प्रत्येक जागेसाठी २ ते ३ सक्षम उमेदवार आमच्याकडे आहेत. आता त्यापैकी प्रत्येक प्रभागात एक उमेदवार देताना दांडगा जनसंपर्क आणि त्याची निवडून येण्याची क्षमता हे निकष विचारात घेतले जातील, असे जिल्हाप्रमुख विजय करंजकर म्हणाले.

या निवडणुकीसाठी २३ मार्च या एकाच दिवशी उमेदवारी अर्ज भरता येतील, तर २८ मार्च या एकाच दिवशी अर्ज मागे घेता येणार आणि ३० एप्रिलला निवडणूक असल्याने देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसराला जणू राजकीय छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. प्रत्येक पक्षाच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

Hemant Godse & Vijay Karanjkar
MESMA Act: चर्चेशिवाय विधीमंडळात 'मेस्मा' विधेयक मंजूर

मतदारांना हवे परिवर्तन : बडगुजर

या वेळी लोकांना परिवर्तन हवे असून त्यामुळे ते शिवसेना ठाकरे गटाकडे मोठ्या आशेने बघत आहेत. भाजप आणि शिवसेना पक्षातून बाहेर पडलेल्या गद्दारांना (शिंदे गट) चांगला धडा शिकविण्याचा चंग मतदारांनी बांधला असून आमचे सर्व उमेदवार निवडून येणारच असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख बडगुजर यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in