Uday Samant: आता पन्नास आहोत, नंतर शंभर होऊ!

उदय सामंत यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार झाला.
Uday Samant
Uday SamantSarkarnama

पिंपळनेर : महाराष्ट्राला (Maharashtra) चालना व दिशा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) प्रयत्नशील आहे. तुम्ही मंजुळा गावित (Manjula Gavit) यांच्या पाठीशी उभे राहा, येथील एमआयडीसी ची वीस वर्षे जुनी प्रलंबित मागणी सहा महिन्यात पूर्ण करू, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले. (we will complete MIDC in a six month time)

Uday Samant
MVP Election: महाराज असते, तर विरोधकांचा कडेलोट केला असता

येथील साई कृष्णा रिसॉर्टमध्ये श्री. सामंत यांच्या हस्ते साक्री तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास संस्थेचे संचालक, सूतगिरणी संचालकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

Uday Samant
MVP Election: मविप्र संस्थेत परिवर्तन घडणार!

हिंदुत्वासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत, टीका करणाऱ्यांना बोलू द्या, पण महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आहेत. आता आम्ही पन्नास आमदार आहोत नंतर शंभर होऊ, विकास कामे आम्ही जोमाने करू, रिक्षा चालक मालक टॅक्सी चालक मालकांसाठी व त्यांच्या परिवारासाठी महामंडळ सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. सरपंचांचा मानधन वाढीसाठी प्रयत्न करू, आमदार मंजुळा गावित यांना मंत्रिपद मिळावे अशी नागरिकांनी केलेली मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रामुख्याने मांडू. हे सरकार शेतकऱ्यांचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

मंत्री सामंतांना निवेदन

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेले साक्री व पिंपळनेर येथे नवीन उद्योगनिर्मितीसाठी व प्रस्तावित एमआयडीसीसाठी जागा भूसंपादन करून उद्योग सुरु करून तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा, व साखर कारखाना सुरु व्हावा. व शेतकऱ्यांसाठी भाजीपाला प्रक्रिया प्रकल्प सुरु व्हावा अशी मागणी आमदार मंजुळा गावित यांच्यासह पिंपळनेर व्यापारी असोसिएशन, सरपंच असोसिएशन यांनी केली. याबाबत निवेदन मंत्री सामंत यांना दिले.

या प्रसंगी, आमदार मंजुळा गावित, डॉ. तुळशीराम गावित, तहसीलदार श्री. चव्हाणके, सतीश महाले, ज्ञानेश्वर नागरे, विनायक अकलाडे, संभाजीराव अहिरराव, सरपंच देविदास सोनवणे, ॲड. ज्ञानेश्वर एखंडे, दिलीप बधान, धनराज जैन, संजय गुजराथी, सागर गावित, सिंधु पवार, मनोज देसले, भूपेंद्र जाधव, अनिल बागूल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तुळशीराम गावित यांनी केले. सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर, वाईद अली सय्यद यांनी केले.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in