Uday Samant: महिनाभरात एमआयडीसीसह फायर स्टेशनचा निर्णय होईल!

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ग्वाही दिली.
Uday Samant in Meeting at Dhule
Uday Samant in Meeting at DhuleSarkarnama

धुळे : साक्री (Dhule) तालुक्यातील पिंपळनेर येथे शासनाचे ४५० एकर क्षेत्र उपलब्ध आहे. तेथे एमआयडीसी (MIDC) कार्यान्वित होण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी शनिवारी येथे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. (State Government will take decision on fire station in a month)

Uday Samant in Meeting at Dhule
MVP Election: महाराज असते, तर विरोधकांचा कडेलोट केला असता

दरम्यान, धुळे एमआयडीसीत ‘फायर स्टेशन', रावेर एमआयडीसीसाठी भूसंपादन, एमआयडीसीचा पाण्याचा प्रश्‍न सोडविणे हा अजेंडा घेऊन मुंबईला जातोय. येत्या महिनाभरात ही सर्व कामे सुरू झालेली असतील अशी ग्वाही श्री. सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Uday Samant in Meeting at Dhule
Jayant Patil: पक्षांतर करणाऱ्या आमदारांविरोधात ‘रान पेटवा’

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात शनिवारी मंत्री श्री. सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, पिंपळनेर परिसरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन होते. या पार्श्वभूमीवर तेथे ‘व्हेजिटेबल पार्क' निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील. धुळे, नरडाणासह औद्योगिक वसाहतीतील अडचणी सोडविण्यासाठी वन विभागाबरोबर मुंबईत बैठक घेण्यात येईल. धुळे औद्योगिक वसाहतीतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी हरणमाळ तलावावरील पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात येईल. त्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने तातडीने प्रस्ताव सादर करावा. तसेच धुळे औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी ‘एमआयडीसी’ने अत्याधुनिक तसेच लहान वाहनांचा समावेश असलेला प्रस्ताव सादर करावा.

विभागीय कार्यालयासाठी इमारत

औद्योगिक विकास महामंडळाच्या धुळे येथील विभागीय कार्यालयाच्या इमारतीचा प्रस्तावही सादर करण्याची सूचना मंत्री श्री. सामंत यांनी केली. ‘एमआयडीसी’ने औद्योगिक क्षेत्राचा विकास करतानाच उद्योजकांच्या अडी-अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. रस्ते, पाणी आदी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. याशिवाय उद्योगांच्या बळकटीकरणासाठीही प्रयत्न करावेत. आगामी काळात ‘एमआयडीसी’ कार्यक्षेत्रात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी धुळे (अवधान) औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. पिंपळनेर येथील जागेची प्राथमिक पाहणी करण्यात आली असून, कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. प्रादेशिक अधिकारी श्री. गावित यांनी ‘एमआयडीसी’च्या धुळे प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाऱ्या विकसित औद्योगिक क्षेत्र ११ असून एकूण क्षेत्र तीन हजार ३२ हेक्टर आहे. भूखंडांची संख्या साडेपाच हजार असून, त्यापैकी चार हजार २८१ भूखंडांचे वितरण झाले असल्याचे सांगितले. आमदार श्रीमती गावित, आमदार डॉ. शाह यांनीही विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

यावेळी आमदार डॉ. फारुक शाह, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सी. वाय. पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी अनिल गावित, कार्यकारी अभियंता एम. एस. पाटील, उद्योजक नितीन बंग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, उद्योजक उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in