Shivsena News; संजय राऊत यांच्याबरोबर जेवले अन् मध्यरात्री शिंदे गटात गेले!

शिंदे गटात गेलेले नगरसेवक खाल्लेल्या मिठालाही जागले नाहीत अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
Shivsena Corporators with CM Eknath Shinde
Shivsena Corporators with CM Eknath ShindeSarkarnama

नाशिक : राज्यभरातून (Maharashtra) सातत्याने शिवसेनेतील (Shivsena Rebel) बंडखोरीच्या बातम्या येत असल्या तरी नाशिकचे (Nashik) सर्व माजी नगरसेवक एकसंघ असल्याचे त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांच्याकडे जाऊन शपथ घेतली होती. दोन दिवसापूर्वी हेच नगरसेवक खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासमवेत जेवले. अन् काल मध्यरात्री एकनाथ शिंदे गटात गेले. राजकारणातील हे वर्तन शिवसेनेसह सामान्य मतदारांनाही धक्कादायक असल्याची चर्चा शहरात सुरु आहे. (Shivsena`s Ex corporators joining of shinde group is shocking for people)

Shivsena Corporators with CM Eknath Shinde
Sushma Andhare News; भाजप नेत्यांसह वारकऱ्यांनी काढली निषेध दिंडी

याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अतिशय संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. जे लोक नेत्यांसमवेत शपथ घेतात व नंतर नीष्ठा बदलतात, त्यांच्याविषयी काय बोलणार. हे लोक स्वतःची अन् राजकारणाची दोन्हीची विश्वासार्हता नष्ट करीत आहे. मतदारांपुढे ते काय सांगतील असा प्रश्न पडल्याचे शिवसेना कार्यालयातील पदाधिकारी सांगत होते.

Shivsena Corporators with CM Eknath Shinde
Chhagan Bhujbal News; राज्यात आणीबाणी लागू केली आहे काय?

शिंदे गटात गेलेल्या तेरा नगरसेवकांपैकी काही जणांनी दोन दिवसांपूर्वी नाशिकला माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या समवेत नाशिकला आलेल्या खासदार संजय राऊत यांच्याबरोबर जेवण केले होते. यावेळी त्यांनी राऊत यांच्या कामकाजाविषयी तोंड भरून कौतुक केले होते. स्तुती सुमने उधळली होती. त्यानंतर काल मध्यरात्री त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हे लोक जर खाल्ल्या मिठाला जगात नसतील, तर येत्या काळात मतदार त्यांच्याविषयी काय विचार करतील.

नाशिकमध्ये ठाकरे गटाने आज पत्रकार परिषद घेत शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांवर हल्लाबोल केला. आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या अजय बोरस्ते यांच्यासह बारा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावरून नाशिकच्या ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com