शरद पवारांविषयी अपशब्द बोलणारे भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले पळाले!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांविषयी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
NCP workers given memorandam to police.
NCP workers given memorandam to police.Sarkarnama

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(NCP President Sharad Pawar) यांच्याविषयी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी बुधवारी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या घरी गेले असता ते पळून गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे.

NCP workers given memorandam to police.
गटबाजीने पोळलेले गुरमितसिंग बग्गा सांभाळणार शहर काँग्रेसची सुत्रे!

यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक तालुका अध्यक्ष गणेश गायधनी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, तुषार भासले हा इसम सातत्याने डिजीयल माध्यमांवर चर्चेत राहण्यासाठी सातत्याने आपल्या कुवतीपेक्षा अधिक व आक्षेपार्ह वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. काल त्यांनी आमच्या नेत्यांविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे नाराज झालेले कार्यकर्ते श्री. भोसले यांच्या घरी गेले होते. मात्र आम्ही येत असल्याचे समजताच ते पळून गेले. त्यांच्या मित्राने ते कोपरगावला गेले आहेत, असे सांगितले.

त्यानंतर हे कार्यकर्ते नाशिक रोड पोलिस ठाण्यात गेले. श्री. भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत आग्रह धरला. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्याची गाढवावरून धींड काढल्याशिवाय राहणार नाही.

NCP workers given memorandam to police.
परमबीर सिंग यांचे समृद्धी महामार्गालगतच्या जमिनींशी लींक लावण्यात पोलिस व्यस्त!

यावेळी गणेश गायधनी, योगेश निसाळ, निखिल भागवत, विनायक कांडेकर, सचिन झोले, वजाहत शेख, माजी नगरसेवक हरिष भडांगे, शादाब सय्यद, प्रज्योत सुरवाडकर, भिमराव सातपुते, अजय जाधव, राहुल तुपे आदींनी पोलिसांकडे तक्रार केली. वरिष्ठांशी चर्चा करून याबाबत कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी यावेळी सांगितले.

भोसलेंचे तोंड फोडावे लागेल

दरम्यान यासंदर्भात राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी श्री. भोसले यांचा निषेध केला आहे. यासंदर्भात त्या म्हणाल्या, भाजपच्या लोकप्रतिनिधींची पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपच्या श्री. भोसले यांनी आमच्या नेत्यांबद्दल अतिशय हीन दर्जाची भाषा वापरली आहे. यामुळे आता तुषार भोसलेंचे तोंड फोडण्याची वेळ जवळ आली आहे असे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, लहानपणापासूनच घरातील आई वडील त्यावर योग्य संस्कार करत असतात. ज्येष्ठांचा सन्मान करणे ही त्यातली संस्कृती असते पण तुषार भोसलेंच्या घरात संस्कृती शून्य वातावरण असेल हे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले. गेल्या दिड वर्षांपासून कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरे बंद होती. कदाचित दक्षिणा मिळत नसल्याने तुषार भोसले यांचे मानसिक संतुलन बिघडलेले दिसते. आता मंदिरे सरकारने खुली केली आहेत. तेव्हा देवासमोर तोंडावाटे श्लोक म्हणा शेण खाऊ नका. नाहीतरी तुमचे तोंड फोडण्याची वेळ जवळ आलीच आहे हे तितकेच सत्य.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com