त्र्यंबकेश्वरला जलाभिषेकासाठी साधू-महंत झाले आक्रमक!

त्र्यंबेकश्‍वर प्रवेशन दिल्यास आज मंदिरासमोर धरणे धरण्याची केली घोषणा.
त्र्यंबकेश्वरला जलाभिषेकासाठी साधू-महंत झाले आक्रमक!
Akhada parishad Sadhu meeting at TrimbkeshwarSarkarnama

नाशिक : कोरोनाचा (Covid19) संसर्ग नियंत्रणात आला असून, तीर्थक्षेत्रांवरील बंदी उठविण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे आज महाशिवरात्रीला भगवान त्र्यंबकेश्‍वराच्या (Trimbakeshwar temple) मंदिराता गर्भगृहात जलभिषेकाची परवानगी मिळावी, यासाठी त्र्यंबकेश्‍वरमधील साधू-महंत आक्रमक झाले आहेत. त्यांनी जिल्हा प्रशासनाने (Collector) याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी करतानाच, परवानगी न दिल्यास प्रसंगी मंदिरासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या पर्वावर येथील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

Akhada parishad Sadhu meeting at Trimbkeshwar
राज्यपाल कोशियारी यांनी आदिवासींच्या वनहक्क कायद्याची मोडतोड केली?

यासंदर्भात आखाडा परिषदेचे महंत शंकरानंद सरस्वती, महंत विष्णुगिरी, महंत धनंजयगिरी, महंत पर्वतगिरी, आनंदपुरी महाराज, अजयपुरी महाराज, महंत सर्वानंद सरस्वती, महंत उदयगिरी, महंत गोपालदास, ठाणापती नारायणदास, स्वामी गोपालदास, सोमेश्‍वरानंद सरस्वती, महंत इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वती यांच्यासह विविध आखाड्यांच्या साधू-महतांच्या सह्यांनिशी अखिल भारतीय षड्‌दर्शन आखाडा परिषदेने आज नाशिक येथे जिल्हा प्रशासनाला निवेदन देत हस्तक्षेपाची मागणी केली.

Akhada parishad Sadhu meeting at Trimbkeshwar
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ओबीसींच्या बाजूने येईल!

त्र्यंबकेश्‍वरला वेगळा नियम ?

निवेदनात म्हटले आहे, की केंद्र सरकारने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवरील बंदी उठविण्याचे आदेश दिले आहेत. पण, त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्टतर्फे कोरोना निर्बंधाचे कारण देत गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात येत आहे. एकप्रकारे अनादी काळापासून चालत आलेल्या परंपरेमध्ये मंदिर ट्रस्ट हस्तक्षेप करत आहे. राज्यात श्रीक्षेत्र भीमाशंकर व घृष्णेश्‍वर येथे साधू-महंत व भाविकांना पूजा करू दिली जात असताना त्र्यंबकेश्‍वरमध्येच बंदी का घालण्यात येत आहे, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

तत्पूर्वी १२ फेब्रुवारीला साधू महंतांनी बैठक घेत देवस्थान प्रशासनाला दर्शनाबाबत निवेदन दिले होते. त्यानंतरही देवस्थान ट्र्स्टने प्रतिसाद दिलान नाही. दोन दिवसांपूर्वी पुन्हा मंदिरात प्रवेशाबाबत निवेदन प्रसिध्दी केल्याने साधू-महंत संतप्त झाले आहेत.

मंगळवारी रात्री मुख्य पूजा होणार

त्र्यंबकेश्‍वर देवस्थानतर्फे महाशिवरात्रीनिमित्त श्री त्र्यंबकराजाची त्रिकाल पूजा होणार असून, सकाळी, सायंकाळी आणि रात्री मुख्य पूजा होईल, असे देवस्थान ट्र्स्टेतर्फे कळविण्यात आले आहे. सकाळपासून भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर पास व पूर्वेकडिल गल्लीतूनही व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचे नियम पाळत दर्शन घ्यावे, असे कळविण्यात आले आहे.

जादा पोलिस बंदोबस्त तैनात

महाशिवरात्रीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी आढावा घेत विशेष बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आठ पोलिस अधिकारी, ८० पोलिस अंमलदार, ४१ गृहरक्षक दल तसेच एसआरपीची एक प्लाटून तैनात करण्यात आली आहे. मंदिर परिसर, कुशावर्त कुंड आणि त्र्यंबकेश्‍वर शहरातील सर्व धार्मिकस्थळांवर हा बंदोबस्त असेल.

गेल्यावर्षी मंदिरे बंद होती, त्यावेळी सर्वांनी नियम पाळले. राज्य शासनाची अधिसूचना संपलेली नाही. राज्यात इतर जिल्ह्यांत काही ठिकाणी मंदिरे सुरू आहेत. पण, ज्या ठिकाणी ९० टक्के लसीकरण झाले आहे, अशाच ठिकाणी मंदिरात पूजाविधी सुरू आहे. नाशिकला अद्याप लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे या वेळीही सर्वांनी नियम पाळावेत.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in