Balasaheb Thorat: आदिवासी हेच आपल्या देशाचे मालक

बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आदिवासी विकास परिषदेतर्फे अधिकाऱ्यांचा सन्मान
Balasaheb Thorat in trible day prograame
Balasaheb Thorat in trible day prograameSarkarnama

नाशिक : देशाच्या (India) स्वातंत्र्याच्या लढ्यात क्रांतीकारकांप्रमाणेच आदिवासी (Trible community) समाजातील क्रांतीकारक (revolutionary) यांचा मोठा वाटा आहे हे कदापीच नाकारता येणार नाही. त्यांचे योगदानाचे विशेष महत्व आहे. कारण आदिवासी (Trible) हेच आपल्या देशाचे मूळ मालक असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले. (Congress celebrates world trible day in Nashik)

Balasaheb Thorat in trible day prograame
Vinod Tawade: महाराष्ट्राच्या राजकारणात नसल्याची अजिबात खंत नाही!

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि युवा राज्यध्यक्ष लकी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गोल्फ क्लब येथे मंगळवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.

Balasaheb Thorat in trible day prograame
BJP news: भाजपच्या जाणत्या मंत्र्यांची वरिष्ठांकडून कानउघडणी?

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर, माजी नगरसेवक राहुल दिवे, ज्येष्ठ नेते संपत सकाळे, जनार्दन माळी, राजेंद्र वाघले, रामदास धांडे, किरण राजवाडे, गणेश गवळी, गोरख बोडके आदी उपस्थित होते.

आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी आयुक्त हिरालाल सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते ‘धरती भगवान बिरसा मुंडा’ तर मनपा सहआयुक्त अशोक अत्राम यांना आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

बाळासाहेब थोरात म्हणाले, की माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देशातील आदिवासी समाजाबद्दल विशेष जिव्हाळा आहे. या समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी कॉंग्रेसकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. राज्यघटनेमुळे आदिवासी समाजाला समान न्याय मिळाला आहे. त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी विविध पदावर जाऊ शकले आहे. यासह २००६ मध्ये कॉंग्रेस सरकारने जमिनींचे खरे मालक असलेले आदिवासी समाजाने वनजमिनीवरील असलेले अतिक्रमण हे खोडून काढत त्यांचे नाव सात बाराच्या उताऱ्यावर लावण्याचे काम कॉंग्रेसने केले. मात्र अजूनही आदिवासी समाजाबाबत मोठे काम करणे बाकी आहे.

आता आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आदिवासी समाजाने संघटित होऊन लकी जाधव यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना ताकद द्यावी, समाजात त्यांचे काम मोठे आहे. संघटित झाले तर आपले प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचे श्री. थोरात म्हणाले.

याप्रसंगी आदिवासी विकास परिषदेतर्फे निमाणी ते गोल्फक्लब येथे शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात समाजातील युवकांनी आपला सहभाग नोंदविला. यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपारिक आदिवासी नृत्याचे सादरीकरणही करण्यात आले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com