आमदार जयकुमार रावल यांना अटक करा!

आदिवासी समाजातर्फे मंत्रालयावर तसेच आझाद मैदानावर केले आंदोलन
Trible agitaion in Mumbai
Trible agitaion in MumbaiSarkarnama

नाशिक : आदिवासी समाजातील (Trible community) नागरिकांना जातिवाचक शिवीगाळ (Atrocity) केल्याप्रकरणी भाजप (BJP) आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे. मात्र अद्याप त्यांना अटक केलेले नाही. त्यांना तत्काळ अटक करून त्यांची आमदारकी निलंबित करावी या मागणीसाठी मंगळवारी आदिवासी विकास परिषदेतर्फे (Trible devoopment Parishad) आझाद मैदान (मुंबई) येथे आंदोलन करण्यात आले. (Trible organisation agitaion against MLA Jaykumar Rawal in Mumbai)

Trible agitaion in Mumbai
महापालिका रस्ते कंत्राटदारांना पाठीशी घालते काय?

या वेळी आमदार रावल यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले.

Trible agitaion in Mumbai
Security: छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करा!

दसऱ्याच्या दिवशी दोंडाईचा शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी भिल्ल समाज बांधवांना जातिवाचक शिवीगाळ केली होती. त्यानंतर दोंडाईचा पोलिस ठाण्यात आमदार रावल यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होवूनही रावल यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आदिवासी समाजातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे आ. रावल यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश देऊन त्यांचे निलंबन करावे, या मागणीसाठी आदिवासी विकास परिषद राज्य युवकाध्यक्ष लकी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, आमदार रावल यांच्या निलंबन व अटकेच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठविण्यात आले आहे. मागणीचा विचार न केल्यास हिवाळी अधिवेशनादरम्यान तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील संघटनेतर्फे देण्यात आला आहे. संदीप गवारी, नीलेश माळी, निशांत चंद्रमोरे, राजू लंगडे आदींसह राज्यभरातील आदिवासी बांधव या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com