ZP News; विजयकुमार गावित यांचा कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांना दणका!

आदिवासी विकासमंत्र्यांच्या निर्णयामुळे शिवसेना- भाजपच्या लोकप्रतिनिधींना ३२५ कोटींची लॉटरी.
Dr. Vijaykumar Gavit
Dr. Vijaykumar GavitSarkarnama

नाशिक : (Nashik) गतवर्षी आदिवासी (Trible) विकास विभागाने मूलभूत सुविधांच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीसाठी दिलेल्या ७२ कोटींच्या निधीतील कामे नव्या आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी रद्द करत, कॉंग्रेस (Congress) व राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांना दणका दिला आहे. (Congress & NCP efforts for funds washed out by BJP minister)

Dr. Vijaykumar Gavit
BJP News; भाजप म्हणते महापालिका प्रशासक ‘जबाब दो’

या रद्द झालेल्या कामांच्या निधीतून आता ३२५ कोटी रुपयांच्या ९२३ नवीन रस्ते विकास कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या असून या कामांसाठी शिवसेना व भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशींना प्राधान्य दिले आहे. यामुळे सत्तांतरानंतर शिवसेना व भाजपच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना ३२५ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे.

Dr. Vijaykumar Gavit
Nashik News; घोषणा फोल, एक कांदा देखील सरकारने विकत घेतलेला नाही!

तत्कालीन आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी निधीचे पुनर्नियोजन करताना नाशिक जिल्हा परिषदेने पाठवलेल्या यादीतील १४४ कोटींच्या कामांसाठी ७२ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. या कामांसाठी आर्थिक वर्षांच्या अखेरच्या दिवशी म्हणजे ३१ मार्च २०२२ रोजी निधी वितरित झाला होता.

यात कॉग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ, नितीन पवार, सरोज अहिरे यांना प्राधान्य दिले होते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले व सरकारने मंजूर झालेली व कार्यारंभ आदेश न दिलेल्या सर्व कामांना स्थगिती दिली होती. या कामांवरील स्थगिती उठविण्याचे अधिकार नंतर संबंधित मंत्र्यांना दिले.

त्यानंतर,या कामांमधील त्रुटी लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाने ही सर्व कामे रद्द केल्याचे शासन निर्णयाद्वारे जाहीर केले होते. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांना दिलेल्या निधीलाच स्थगिती देण्याचे धोरण विद्यमान सरकारने घेतले होते. त्याचाच भाग म्हणून आदिवासी विकास विभागाने मागील गतवर्षी पुनर्नियोजनातून मंजुरी दिलेली जवळपास ३०० कामे कामे रद्द केली.

Dr. Vijaykumar Gavit
AAP News : 'आप'च्या सिसोदिया, जैन यांनी या कारणांसाठी दिला राजीनामा

एकदा वितरित केलेला निधी परत घेता येत नाही. यामुळे या निधीतून नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देऊन कामांची यादी जिल्हा परिषदेकडून मागितली. ही नवीन कामे मंजूर करताना आदिवासी विकास विभागाने शिवसेना- भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या शिफारशींना प्राधान्य दिले. जिल्ह्यासाठी यापूर्वी मंजूर झालेला ७२ कोटींचा निधी तसाच ठेवून त्यातील कामांची संख्या वाढवण्यात आली आहे. यामुळे या महिन्यात निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार ७२ कोटींच्या निधीतून ३२५ कोटी रुपयांची ९२३ कामे मंजूर करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com