आमदार बोरसेंची गाडी तरुणींनी अडवली, देणगी मिळाल्यावरच सोडली!

जाड गोळवाड (साल्हेर) येथील तरुणींनी गौराईचे गीत म्हणत आमदार दिलीप बोरसे यांची गाडी अडवली.
आमदार बोरसेंची गाडी तरुणींनी अडवली, देणगी मिळाल्यावरच सोडली!
MLA Dilip Borse & Trible girls, MLA Dilip Borse Latest Marathi News, Satana News in MarathiSarkarnama

साल्हेर : बागलाणच्या (Satana) आदिवासी (Trible) पश्‍चिम पट्ट्यात साल्हेर, भिकारसौडा, पायरपाडा, जाड गोळवाड, भाटाअंबा वाघ, आंबा, मानूर, आलियाबाद, महादर, गडी पाडा, मोराळा, बारीपाडा, सावरपाडा आदी गावांमध्ये गौराईची (Gauri) स्थापना करून तरुणींकडून वर्गणी (Donations) जमा केली जात आहेत. (MLA Dilip Borse Latest Marathi News)

MLA Dilip Borse & Trible girls, MLA Dilip Borse Latest Marathi News, Satana News in Marathi
भाजप आमदार संजय सावकारे म्हणाले, मला राष्ट्रवादीकडून ऑफर, पण...

मंगळवारी दुपारी दोनला आमदार दिलीप बोरसे हे ताराबादकडून पश्‍चिम आदिवासी पट्ट्यातील जाड गोळवाड या गावांकडे दौरा करत असताना त्यांची गाडी गौराईच्या तरुणींनी अडवली. तेव्हा आमदार दिलीप बोरसे गाडी थांबवून तरुणींसमोर उभे राहिले. कडक उन्हात डोक्यावर कळस घेऊन गौराईचे गीत तरुणींनी सादर करून आमदार दिलीप बोरसे यांचे मन जिंकले. आमदार बोरसे यांनी रोख स्वरूपाची देणगी कळसामध्ये टाकत तरूणींना नमस्कार केला.

MLA Dilip Borse & Trible girls, MLA Dilip Borse Latest Marathi News, Satana News in Marathi
राणांवर कारवाई करता मग मिटकरींवर का नाही?

परंपरेनुसार अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नऊ दिवस अगोदर आदिवासी भागांमध्ये गौराईची स्थापना करण्यात येते. गौराईची स्थापना अविवाहित मुलींकडून केली जाते. त्यानंतर नऊ दिवस मुली उपवास धरतात. दररोज सकाळी ज्या ठिकाणी तीर्थ स्थान मंदिर आहे त्या ठिकाणी सर्व मुली जातात. त्या मंदिराच्या ठिकाणाहून तीर्थाचा कळस भरला जातो. तो कळस मुली डोक्यावर ठेवून रस्त्याने जाणारी वाहने अडवून त्यांच्याकडून वर्गणी मागितली जाते.

आजच्या डिजिटल युगात आजही आदिवासी भागांमध्ये वर्षानुवर्ष सुरू असलेले पारंपारिक रितीरिवाज आदिवासींमध्ये राबवले जातात. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तरुणींनी गौराईची स्थापना करून आदिवासींची परंपरा कायम जपली आहे. यापुढेही तरुण पिढीने अशा उत्साहात सहभाग नोंदवून आदिवासी संस्कृती जपावी.

- दिलीप बोरसे, आमदार, बागलाण

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.