आदिवासी विकासमंत्री गावितांना नंदुरबारमध्ये धक्का; पुतणीचा शिवसेनेकडून पराभव

राज्यातील ५४१ ग्रामपंचायतच्या (Gram Panchayat) निवडणुकांची मतमोजणी आज पार पडली
Dr. Vijaykumar Gavit
Dr. Vijaykumar GavitSarkarnama

Gram Panchayat Election : नंदुरबार : राज्याचे आदिवासी विकासमंत्री व भाजप (BJP) नेते डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijayakumar Gavit) यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. गावित यांची पुतणी व नंदुरबार (Nandurbar) पंचायत समिती सभापती प्रकाश गावित यांची मुलगी प्रतिभा जयेंद्र वळवी या दुधाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी भाजपकडून उभ्या होत्या. त्यांचा शिवसेनेच्या अश्‍विनी प्रकाश माळचे यांनी पराभव केला.

Dr. Vijaykumar Gavit
अकोल्यात भाजपला धक्का; शिवसेनेची मुसंडी, अपक्षांचे वर्चस्व!

प्रतिभा वळवी यांचा अश्‍विनी माळचे यांनी तब्बल ५४१ मतांनी पराभव केला. दरम्यान, नंदुरबार तालुक्यात लक्ष लागून असलेल्या कोळदे ग्रामपंचायतीत भाजप तर होळतर्फे हवेली ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय झाला. नंदुरबार पंचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले यांचे गांव असलेले आष्टे गावात भाजपला विजय मिळाला आहे.

नंदुरबार तालुक्यातील 75 व शहादा तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. संध्याकाळी चार वाजेपर्यंत नंदुरबार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहे. मात्र, शहादा तालुक्यात आतापर्यंत जवळपास 42 ग्रामपंचायतींचेच निकाल जाहीर झाले आहेत.

Dr. Vijaykumar Gavit
संभाजीराजेंच्या 'स्वराज्य'चा ग्रामपंचायत निवडणुकीत श्रीगणेशा; मिळवला पहिला विजय

दरम्यान, धुळे जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल हाती आला आहे. यातील तब्बल 32 जागांवर भाजपने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोहोर उमटवली आहे. शिवसेना, शिंदेगट व इतर पक्षाला भोपळाही फोडता आला नसल्याचे चित्र आहे. धुळे जिल्ह्यातील 33 ग्रामपंचायतीसाठी रिमझिम पावसातही नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ग्रामपंचायत निकालात भाजपने सुरवातीपासून आघाडी घेतल्याचे दिसून आले. तर शेवटपर्यंत भाजपने सर्वच जागा जिंकून राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com