आदिवासी महामंडळ बोगस नोकर भरती प्रकरणातील अधिकाऱ्यांचे जामीन अर्ज फेटाळले

एक महिन्यापूर्वी गुन्हा दाखल होवूनही अद्याप एकाही संशयितास अटक झालेली नाही.
आदिवासी महामंडळ बोगस नोकर भरती प्रकरणातील अधिकाऱ्यांचे जामीन अर्ज फेटाळले
bailSarkarnama

नाशिक : आदिवासी विकास महामंडळ व शबरी वित्त महामंडळाच्या बोगस नोकर भरती प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या दोन अधिकाऱ्यांसह एकाचा जामीन (Bail) अर्ज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आज (ता.12 जानेवारी) फेटाळून लावला आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशयित अधिकाऱ्यांसह कुणाल आयटी कंपनीच्या संचालकांच्या अटकेचा मार्ग सुकर झाला आहे.

bail
महसूलमंत्र्यांच्या दोन स्वीय सचिवांनाच गंडविण्याचा प्रयत्न

आदिवासी विकास महामंडळाच्या नोकर भरतीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला होता. याप्रकरणाची तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी सखोल चौकशी केल्यानंतर भरती प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे देखील सांगितले होते. तब्बल सहा वर्षानंतर ९ डिसेंबर २०२१ ला मुंबई नाका पोलिस ठाण्यात या भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन माजी महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे, चौकशी अधिकारी तथा तत्कालीन अप्पर आदिवासी आयुक्त अशोक लोखंडे व पुणे येथील कुणाल आयटी कंपनीचे संचालक संतोष कोल्हे यांच्याविरुद्ध व्यवस्थापकीय संचालक दिपक सिंगला यांच्या आदेशाने व महाव्यवस्थापक जालिंदर आभाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

bail
पोलिसांनी टेम्पोभर कागदपत्रे जमा केली.. पण महाजन यांना ते हात लावू शकणार नाहीत

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यावर मंगळवारी (ता.११ जानेवारी) जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

यावेळी सरकारी पक्षातर्फे ॲड. पंकज चंद्रकोर यांनी बाजू मांडत म्हणाले, याप्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला व या अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचा देखील सहभाग असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून संबंधितांच्या जवळच्या व्यक्तींचीच महामंडळात नेमणूक झाली आहे. या सर्वांची अजून चौकशी होणे गरजेचे असल्याने संशयितांचा अटकपूर्व जामिन अर्ज मंजूर करु नये, असे सांगितले. यावर न्यायालयाने संशयितांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे संशयित अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्याने आता यातील सर्व संशयितांच्या अटकेचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. एक महिन्यापूर्वी याप्रकरणी गुन्हा दाखल होवूनही अद्याप एकाही संशयितास पोलिस प्रशासनाकडून अटक झालेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in