गद्दार गुलाबरावांना स्मृतिभ्रंश झाला आहे!

शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत म्हणाले, पद न मिळाल्याने युवासेनेचे पदाधिकारी पळाले.
Gulabrao Patil & Sanjay Sawant
Gulabrao Patil & Sanjay SawantSarkarnama

जळगाव : निवडणुका कशा लढवाव्या हे काल आपल्यासोबत बसून समजून घेत होते, तेच म्हणतात निवडणूक कशा लढवाव्या लागतात हे आम्हाला माहीत नाही. सुरत, गुवाहाटी, गोवा फिरून गद्दार आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा स्मृतिभ्रंश झाला आहे, असा सणसणीत टोला शिवसेना (Shivsena) जिल्हा (Jalgaon) संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी लगावला आहे. (Sanjay Sawant criticised rebel Gulabrao Patil for political move)

Gulabrao Patil & Sanjay Sawant
चार सदस्यांचा प्रभाग ही राहणार केवळ चर्चाच !

युवा सेनेच्या प्रमुखांना विभागप्रमुख पदाची अपेक्षा होती, ते पद न मिळाल्याने ते पळाले, असा आरोपही त्यांनी केला आहे. हॉटेल के. पी. प्राईड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, महापालिकेचे शिवसेना विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे आदी उपस्थित होते.

Gulabrao Patil & Sanjay Sawant
आदित्य यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये; बाळासाहेबांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला?

संजय सावंत म्हणाले, जे आमदार शिवसेना सोडून गेले, ते बंडखोर नव्हे गद्दार आहेत. हेच गद्दार मर्दुमकीची भाषा करीत आहेत. त्यांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यानंतरच अशा घोषणा कराव्यात. निवडणुका लढविणे काय असते ते नेत्यांना कळत नाही, या गुलाबराव पाटील यांच्या आरोपाला उत्तर देताना सावंत म्हणाले, सुरत, गुवाहाटी, गोवा फिरून त्यांचा स्मृतिभ्रंश झाला आहे. निवडणुकीच्या अगोदर आपल्याजवळ बसून हेच गुलाबराव पाटील रणनीती काय हे समजून घेत होते. आता तेच म्हणत आहेत. निवडणुका कशा लढवाव्या हे यांना कळत नाही. त्यांनी अगोदर मागील सर्व आठवावे.

आदित्य ठाकरेंवर गुलाबराव पाटील यांनी टीका करीत म्हटले होते, की आदित्य यांनी हेच दौरे अगोदर केले असते तर शिवसेना बळकट झाली असती. त्यावर सावंत म्हणाले, की गुलाबराव तुम्ही शिवसेनेत असताना आपला तालुका सोडून जिल्हाभरात शिवसेना बळकट केली असती तर तुमच्या तालुक्याच्या कार्यकर्त्यांवरच तुम्हाला मर्यादित रहावे लागले नसते.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in