नमिता मुंदडा यांच्या प्रश्नात इंग्रजी शब्दांचाच भडीमार!

अवैध दारु प्रकरणी आंबोजोगाईचे पोलिस निरीक्षक बडतर्फ
Namita Mundada
Namita MundadaSarkarnama

मुंबई : अवैध दारू (Illegal liquer) कारवाई प्रकरणी आरोपीला मदत केल्याने आंबेजोगाई (Ambejogai) पोलिस ठाण्याचे पोलिस (Police) निरीक्षक वासुदेव मोरे (Vasudeo More) यांना निलंबीत करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज केली. आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवरील चर्चेनंतर ही कारवाई झाली. यावेळी राज्य शासन मराठीचा आग्रह धरत असताना श्रीमती मुंदडा यांनी विचारलेल्या प्रश्नात सुमारे निम्मे शब्द इंग्रजी होते हे विशेष. (Dy. C. M. suspends Police inspector in Illegal liquer case action)

Namita Mundada
Bhaskar Jadhav: भास्कर जाधव यांनी अडथळा आणणाऱ्या नितेश राणेंना खडसावले

आंबेजोगाई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यावरील कारवाईच्या विषयावर आज विधानसभेत आमदार मुंदडा यांनी लक्षवेधी मांडली होती. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी रोहीत राजू चव्हाण यांच्या विरोधात कारवाई केली होती. त्याबाबत सातत्याने तक्रारी असल्याचे मुंदडा यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, या पोलिस ठाण्यात सामान्य नागरिक तसेच लोकप्रतिनिधी यांच्याएैवजी दारूविक्रेते व अवैध व्यावसाय करणाऱ्यांना जास्त मान मिळतो.

Namita Mundada
Nashik News: शेतीचे पंचनामे तातडीने करा, भरीव मदत द्या!

अवैध दारु विक्रीबाबत आपण तक्रार केली होती. त्यावर येथील पोलिस निरीक्षकांनी अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई केल्याचे सांगितले. त्यात त्यांनी ३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला तसेच दारु तयार होणाऱ्या या कारखान्याचा मालक फरार असल्याचे सांगितले. मात्र दुसऱ्याच दिवशी येथे राज्य उत्पादन शुल्क विभगाने कारवाई केली. त्यात त्यांना हा दारु तयार करणारा सापडला. तसेच त्यांना २.२२ लाखांचा माल सापडला. जर विक्रेता फरार होता तर तो त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी कसा सापडतो. सर्व मुद्देमाल जप्त केला असेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाला पुन्हा असे साहित्य कसे सापडते. त्यामुळे येथे अवैध दारु विक्री व निर्मिती करणाऱ्यांना संरक्षण दिले जाते. त्याचा एक पॅटर्न त्यांनी तयार केला आहे, असे त्यांनी सांगितले.

या चर्चेत विविध सदस्यांनी भाग घेतला. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिस निरीक्षकांना बडतर्फ करण्याची घोषणा केली. जिल्हा पोलिस अधिक्षकांची अकार्यकारी पदावर बदली करण्याची देखील घोषणा झाली.

इंग्रजी शब्दांचा भडीमार...

आमदार मुंदडा यांनी विचारलेल्या प्रश्नात मराठी पेक्षा इंग्रजी शब्द अधिक होते. त्यातील प्रमुख इंग्रजी शब्द असे, ऑफीसर, रेड, करप्शन चार्जेस, हॅपनींग अंडर द लिडरशीप ऑफ अंबोजोगाई डीवायएसपी, ओपनली, एफर्डस्, एसपी, स्ट्रीक्ट, अॅक्शन, रिसपेक्ट, शॅाकींग, इन्सीडेन्ट, ट्वेंटी ट्वेंटी टू, टू पीएम, इललीगल, रिपोर्ट, थ्री लॅक फोर्टी थाऊसंड फोर्टी सीक्स थाऊजंड, लँड ओनर, कारखाना ओनर, वेरी नेक्स्ट डे, टू लॅख ट्वेंटी टू थाऊजंड फोर हंड्रेड फोर्टी, एक्सासाईज, मॅन्युपलेट, आय वील आस्क, डीपार्टमेंट, क्लीअरली, कंप्लीटली, इन्वॅालमेंट, इन्सीडेंट, इट इस व्हेरी इम्पॅारटंट, पॅटर्न, प्रॅाब्लमेटीक, आय वुड लाईक टू रिअली रिक्वेस्ट यू, ट्रान्सफर, अॅक्शन, वील, यू ऑलसो, ससपेंड, डीसीएम.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com