गडकरी साहेब, टोल नाक्यांचा गुंता सोडवा, जनतेचे पैसे वाचवा!

नितीन गडकरी ६० किलोमीटर अंतरातील टोल नाक्यांचा गुंता सोडवतील का?
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

धुळे : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महिन्यापूर्वी ६० किलोमीटर अंतरात एकच टोलनाका (Toll Plaza) राहिल आणि सर्वेक्षणाअंती अधिक नाके आढळल्यास तीन महिन्यांत तो टोलनाका हटविला जाईल, असे जाहीर केले. त्यानुसार धुळे (Dhule) शहरासह राज्यभरात अनेक टोल नाके आहेत. त्यातून रोज कोट्यावधींची वसुली होते. पेट्रोल दरवाढीने (Fuel price hike) त्रस्त नागरिकांना ही झळ असह्य आहे. हा प्रश्न नितीन गडकरील सोडवतील का? असा प्रश्न केला जात आहे.

Nitin Gadkari
गडकरी येता घरी...महापालिका एका रात्रीत १६ लाखांचा रस्ता करी!

धुळे शहरातील परिसरातील लळींग टोलनाकाच झोडग्याकडे हलवावा लागेल, असे दिसते, अन्यथा सुरत- धुळेमार्गे अमरावती महामार्गावर इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ प्रस्तावित टोलनाका झाला, तर तो लळींगपासून पुन्हा ६० किलोमीटर अंतराच्या आत येईल. त्यामुळे येथील हा गुंता मंत्री गडकरी यांनी सोडवावा, अशी मागणी व्यापारी महासंघ व खानदेश औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष नितीन बंग यांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून केली.

Nitin Gadkari
राज ठाकरेंच्या राजकीय डावपेचात मशिदींसह मंदीरेही अडचणीत?

लळींग टोलनाक्यापासून सरासरी २० ते २५ किलोमीटरवर सोनगीर आणि तेथून सरासरी ३० ते ३५ किलोमीटरवर शिरपूर टोलनाका आहे. या सरासरी ५० ते ५५ किलोमीटरमधील तीन टोलनाक्यांसाठी किमान चारचाकी वाहनधारकाला सरासरी ३७५ रुपये मोजावे लागतात. यातही शिरपूर शहरात महामार्गावरून प्रवेशासाठी अकारण शंभर रुपयांचा भुर्दंड कारचालकाला सोसावा लागतो. अवजड वाहनांच्या रक्कमेचा विषय तर वेगळाच आहे. यात मंत्री गडकरी यांच्या निर्णयानुसार सर्वेक्षणाअंती अवलोकन केले, तर सोनगीरचा टोलनाका हटू शकतो.

अंतराचा गुंता लक्षात घ्यावा

असे असताना सुरत धुळेमार्गे अमरावती महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. यात इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ टोलनाका प्रस्तावित आहे. तो दहिवेलपर्यंत लागू असेल. या मार्गासाठी लळींग ते चांदवड मार्गावरील टोलनाक्याप्रमाणे रकमेची आकारणी होईल. चांदवडला २१० रुपयांचा टोल भरला तर लळींग टोलवरून सोडले जाते किंवा लळींगला टोल भरला तर चांदवड नाक्यावरून सोडले जाते. त्याप्रमाणे इच्छापूर्ती गणेश मंदिर व दहिवेलपर्यंतच्या टोलनाक्यावर वसुलीची अंमलबजावणी होईल. मात्र, लळींग टोल नाक्यापासून इच्छापूर्ती गणेश मंदिर सरासरी २० ते २५ किलोमीटरवर आहे. त्यामुळे मंत्री गडकरी यांच्या निर्णयाप्रमाणे ६० किलोमीटरच्या अंतरात पुन्हा दोन टोलनाके होतील. याविरुद्ध दिशेलाही जळगाव मार्गावरील टोलनाक्याचे अंतर यंत्रणेला लक्षात घ्यावे लागेल.

निर्णयाची प्रतिक्षा

या पार्श्वभूमीवर धुळे शहर परिसरातील टोलनाक्यांचे अवलोकन केले तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला लळींग टोलनाका झोडगे परिसराकडे हलविण्याशिवाय गत्यंतर नाही. तेथून पिंपळगावच्या टोल नाक्यापर्यंतचे अंतर तपासून अर्थात ६० किलोमीटर अंतराचा निकष लाऊन योग्य तो निर्णय घेतला जावा. हा गुंता आगामी काळात जटील होण्यापेक्षा मंत्री गडकरी यांनी आताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या येथील यंत्रणेकडून माहिती जाणून घ्यावी आणि योग्य तो आदेश द्यावा, अशी अपेक्षा श्री. बंग यांनी व्यक्त केली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com