आजचा वाढदिवस...बबनराव घोलप, माजी मंत्री.

बबनराव घोलप हे राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते आहेत.
आजचा वाढदिवस...बबनराव घोलप, माजी मंत्री.
Baban Gholap, Shivsena leaderSarkarnama

बबनराव घोलप हे राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते आहेत. गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या घोलप यांचा वाढदिवस आज त्यांचे समर्थक, शिवसेना कार्यकर्ते व नागरीकांनी त्यांना शुभेच्छा देऊन साजरा केला. करोनाची बंधने असल्याने आज तो साधेपणाने साजरा करण्यात आला.

Baban Gholap, Shivsena leader
शिवसेनेचे महानगरप्रमुख कचऱ्याचे कंत्राटदार ‘वॉटरग्रेस’चे भागीदार

बबनराव घोलप यांनी १९८५ मध्ये शिवसेनेतर्फे मशाल या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढली. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. १९९५ मध्ये दुसऱ्यांदा विजयी झाल्यावर शिवसेना- भाजप युती सरकारमध्ये ते समाज कल्याण मंत्री बनले.

Baban Gholap, Shivsena leader
आमदार सरोज अहिरे शिवसेनेला खरोखर शिंगावर घेतील?

त्यानंतर या मतदारसंघातून ते सलग पाच वेळा आमदार बनले. देवळाली शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघासाठी त्यांनी वालदेवी धरणाच्या निर्मितीसाठी पाठपुरावा केला. वालदेवी नदीवर लहान बंधारे बांधण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांनी शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडवला.

चर्मकार समाजाच्या विविध जाती, घटकांना एकत्र आणून संघटन निर्माण करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघ स्थापन केला. त्याचे ते अध्यक्ष आहेत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पूत्र योगेश शिवसेनेतर्फे निवडून आले आहेत. बबनराव घोलप चित्रपटक्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यांनी नीलांबरी या चित्रपटाची निर्मिती केली. कलेची आवड असल्याने त्यांनी अनेक कलाकार, निर्मात्यांना नेहेमीच मदत केली. विविध चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या.

...

Related Stories

No stories found.