Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर निवडणूक; भाजपचे गिरीश महाजन कोणता 'डाव' खेळणार

Nashik Graduate Constituency Election: नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याची आज अंतीम मुदत
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

जळगाव : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतीम मुदत आहे. भारतीय जनता पक्षाने मंत्री गिरीश महाजन यांच्यावर या मतदार संघाची जबाबदारी टाकली आहे.

या ठिकाणी भाजपचा अधिकृत उमेदवार नसला तरी भाजपच्या शुंभागी पाटील यांना शिवसेनेने पाठींबा दिला आहे. त्यांच्या माघारीबाबत भाजपमधून आता चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे यासाठी गिरीश महाजन कोणती खेळी करून भाजपला 'संकटातून' बाहेर काढणार याकडे लक्ष आहे.

कॉंग्रेसचे (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना एबी फॉर्म देवूनही त्यांनी पक्षातर्फे अर्ज दाखल केला नाही. मात्र, त्यांचे पूत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आणि राज्यभरात एकच खळबळ उडाली.

मात्र, दुसरीकडे भाजपचाही अधिकृत उमेदवार नसल्यामुळे भाजपचा हा डाव असल्याची चर्चा सुरू झाली. यातच शिवसेनेनेही डाव खेळला आणि भाजपच्या अपक्ष अर्ज दाखल केलेल्या धुळे येथील शुंभागी पाटील (Shumbhagi Patil) यांना पाठींबा दिला. त्यामुळे भाजपच्या गोटात धडकी भरली आहे.

Girish Mahajan
Nana Patole : पदवीधर आणि शिक्षकांनी भाजपचा डाव ओळखला, आम्ही पाचही जागा जिंकू !

आता शुंभागी पाटील यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात यावा, यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली असून ते नाशिक येथे मुक्कामी आहेत. सद्य स्थितीत शुंभागी पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असून त्या संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे सांगितले जात असल्याने चर्चा सुरू झाली आहे.

Girish Mahajan
Ambadas Danve : तीस-तीस घोटाळ्यात दानवेंचे नाव ; पण ते म्हणतात, तो मी नव्हे..

अर्ज मागे घेण्याची दुपारी तीन वाजेपर्यंत अंतीम मुदत आहे. त्यानंतर या मतदार संघाचे चित्र स्पष्ट होणार आहे. शुंभागी पाटील यांनी माघार घेतल्यास या मतदार संघातील सत्यजीत तांबे यांच्यासमोरील आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

मात्र, त्यांची उमेदवारी कायम राहिल्यास त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुंभागी पाटील यांची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. तर शिवसेना त्यांची उमेदवारी कायम रहावी यासाठी प्रयत्नशिल आहे.

Girish Mahajan
Nashik Graduate Constituency : भाजपच्या धनंजय जाधव यांची माघार; माघारीपूर्वी सत्यजित तांबेंबाबत केले मोठे विधान

शुंभागी पाटील या स्वत:च आपल्या उमेदवारीला पाठींबा मागण्यासाठी मातोश्री येथे शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे गेल्या होत्या. त्यांनतर उद्धव ठाकरे यांनी शुंभागी पाटील यांच्या उमेदवारीला पाठींबा जाहीर केला होता.

मात्र, आता भाजप त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्नशिल आहे. मंत्री गिरीश महाजन यासाठी कोणती खेळी खेळतात याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com