संसार उभारायला अक्कल लागते, धुडगूस घालायला नाही!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत येवला येथे शिवसृष्टीचे भूमिपूजन
Ajit Pawar, Dy. C. M.
Ajit Pawar, Dy. C. M. Sarkarnama

येवला : माणसांचे संसार उभे करायला अक्कल लागते, धुडगूस घालायला अक्कल लागत नाही. लोकांना भडकावून (Provoke People) प्रश्न सुटत नाही बांधवांनो, प्रत्येकाने राज्याच्या (Maharashtra) हितासाठी विचार करावा, तुम्हाला-आम्हाला प्रगती व विकासासाठी जातीय सलोखा ठेवावाच लागेल, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

Ajit Pawar, Dy. C. M.
राज ठाकरेंना इशारा?... राणा दाम्पत्याचे काय झाले लक्षात आहे ना?

येवला येथे पालकमंत्री छगन भुजबळांच्या पुढाकाराने उभ्या राहणाऱ्या शिवसृष्टीचे भूमिपूजन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री भुजबळ होते.

Ajit Pawar, Dy. C. M.
हे कोल्हापूर आहे! मुस्लिम बांधवांनी शिवजयंती सोहळ्यात सोडला अखेरचा रोजा

श्री. पवार म्हणाले, गेली ५५ वर्षे आमचे नेते शरद पवार सर्व जातीधर्माला सोबत घेऊन चालताय, तरी नको ते आरोप करून राज्याचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवार महापुरुषांचे नावच घेत नाही, तर त्यांच्या विचारावर चालण्याच काम करत आहेत. बोलणाऱ्याचं वय तेवढी, वर्षे पवारसाहेबाचं राजकारणातील आयुष्य आहे, असा टोमणा त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

राज्याला आग लावू नका

ऐतिहासिक असलेल्या या शहरात शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी भव्यदिव्य शिवसृष्टी उभी राहणार आहे. राजेसह अष्टप्रधान मंडळाची सचित्र माहिती येथे पाहायला मिळेल असे श्री.भुजबळ यांनी सांगितले. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर राज्याची वाटचाल सुरू असून, शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांचे नाव आज टेन्शन देण्यासाठी वापरले जाते, याची खंत वाटतेय. मुस्लिम द्वेष करणारे भिडे गुरुजी सायकलवरून पडले; पण त्यांचेच ऑपरेशन मुस्लिम डॉक्टरानी केले, हे सांगत माणुसकीपुढे धर्म नसल्याचे भुजबळ म्हणाले.

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माजी आमदार मारोतराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी सभापती संभाजी पवार, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, कल्याणराव पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, हुसेन शेख, जयदत्त होळकर, माजी सभापती संजय बनकर, महेंद्र काले, राधाकिसन सोनवणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रतन बोरणारे आदी उपस्थित होते. प्रारंभी श्री. पवार व श्री. भुजबळ यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून भूमिपूजन झाले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com