Balasaheb Thorat: भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हेच उद्दिष्ट

चोपडा येथे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा ॲड. संदीप पाटील यांनी सत्कार केला.
Balasaheb Thorat with Arub Gujrathi
Balasaheb Thorat with Arub GujrathiSarkarnama

चोपडा : येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Front) एकत्र लढण्याबाबत सर्व पक्ष मिळून निर्णय घेतला जाईल. भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवणे हेच आमचे कायम उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले. (All alliance of mahavikas front unanimously face elections)

Balasaheb Thorat with Arub Gujrathi
Congress: विधानपरिषदेचे विरोध पक्षनेतेपद न मिळाल्याने कॉंग्रेसची नाराजी

चोपडा येथे बुधवारी महात्मा गांधी शिक्षण मंडळास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सभागृहात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. स्मिता पाटील यांनी

Balasaheb Thorat with Arub Gujrathi
Balasaheb Thorat: आदिवासी हेच आपल्या देशाचे मालक

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पदवीधर आमदार सुधीर तांबे यांचा सत्कार केला. चोपड्यात दुसऱ्यांदा भेट दिली असल्याची माहिती ॲड. संदीप पाटील यांनी व्यक्त केली.

या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना पाटील, विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रा. डी. बी. देशमुख, अजबराव पाटील आदी उपस्थित होते. राज्यात पावसाने दहा ते पंधरा लाख हेक्‍टरवर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, पंचनामे करण्यास सुरवात नाही. शासनाचे निर्देश नाही, खातेवाटप नाही. मंत्रिमंडळात महिलांना स्थान दिलेले नाही. ज्यांच्यावर महिलांच्या अत्याचाराचे आरोप आहेत, असे लोक मंत्रिमंडळात सदस्य झाले आहेत, ही दुर्दैवी गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

माजी शिक्षणमंत्र्यांना अभिवादन

महाराष्ट्राच्या माजी शिक्षणमंत्री (स्व.) शरदचंद्रिका सुरेश पाटील यांचे महात्मा गांधी शिक्षण मंडळ परिसरात असलेल्या स्मारकावर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुष्प अर्पण केले.

अरुणभाईंच्या निवासस्थानी भेट

महात्मा गांधी शिक्षण मंडळ परिसरात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्याकडे श्री. थोरात यांनी भोजन केल्यानंतर दुपारी पावणेतीनला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. त्यानंतर तिथून ते फैजपूरकडे रवाना झाले. चोसाका संचालक गोपाळ धनगर, माजी पंचायत समिती सदस्य अनिल पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, संचालक राजेंद्र पाटील मधुकर बाविस्कर, माजी शहराध्यक्ष संजीव बाविस्कर, दिलीपराव साळुंखे, देविदास सोनवणे, नंदकिशोर सांगोरे, रमाकांत सोनवणे, शशिकांत साळुंखे, अशोक साळुंखे, किरण सोनवणे, शहराध्यक्ष के. डी. चौधरी, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, रमेश शिंदे, एस. बी. पाटील, माजी नगरसेविका सुप्रिया सनेर, योगिता चौधरी, फातिमा पठाण, गुलाब बारेला, संदीप बोरसे, भागवत पाटील, आरिफ शेख, ज्ञानेश्वर कोळी, घनश्याम पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com