Hindutva : हिंदुराष्ट्रासाठी भारतासह तिबेट, भूतान, बांगलादेश एकत्र येतील

स्वामी अधोक्षाजानंद देवतीर्थ यांनी हिंदूराष्ट्र उभारणीला सुरवात झाल्याचा दावा केला.
Shankracharya Adhokshjanand
Shankracharya AdhokshjanandSarkarnama

नाशिक : संपूर्ण भारत (India) हे एक हिंदूराष्ट्र म्हणून उदयास येईल, त्याची मुहूर्तमेढ सुरू झाली आहे, भारतापासून तिबेट, भूतान, बांगलादेश भारतीय महाद्वीप एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली, असा दावा जगन्नाथ पुरी (Jagganath Puri) शंकराचार्य श्री स्वामी अधोक्षजानंद देवतिर्थ महाराज (Swami Adhokshjanad) यांनी केला. (Swami adhokshjanand claim that hindurashtra foundation is begen)

Shankracharya Adhokshjanand
NCP; जे. पी. गावित यांना खिंडीत गाठण्याचा डाव फसला?

जगन्नाथ पुरी येथील शंकराचार्य श्री स्वामी अवधक्षानद देवतिर्थ महाराज हे १९ नोव्हेंबरपासून १२ ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठांच्या दौऱ्यांवरती असून त्या अंतर्गत ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत, त्यामध्ये त्यांनी बुधवारी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन दर्शन घेतले, तसेच गोदावरी नदीची पूजा केली.

Shankracharya Adhokshjanand
Swarajya; कर्नाटकात घुसून कन्नडीगांना धडा शिकवू!

यावेळी माजी नगरसेवक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण मंडाले होते. त्र्यंबकेश्वर येथे आखाडा परिषदेचे महामंत्री हरी गिरी महाराज व अन्य आखाड्याचे अध्यक्ष यांची देखील त्यांनी भेट घेतली.

ते म्हणाले की, भारत हे एक हिंदू राष्ट्र उभारणीची सुरवात झाली आहे, त्याचे पहिले पाऊल काश्मीरमध्ये ३७० व कलम हटवलं गेलं हिंदू राष्ट्र निर्मितीची संकल्पना ही यापूर्वी मांडली गेली होती आणि आता त्याची प्रत्यक्षात पावले देखील पडत आहेत येणाऱ्या काळामध्ये गुरुकुल ही संकल्पना वाढीस लागली पाहिजे, त्याचबरोबर गो शाळांची निर्मिती देखील झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ती होत आहे.

देशाच्या काही भागांमध्ये गोशाळा निर्मिती झाली आहे पुढे ती होत राहील. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादा बाबत म्हणाले की, देशाच्या विविध राज्यांमध्ये सीमावाद आहे परंतु हा सीमावाद हा तात्त्विक आहे. नाशिकमध्ये येणारा कुंभमेळा हा एक वेगळा कुंभमेळा असेल त्यामुळे त्याचे नियोजन हे आतापासून केले गेले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून शासन आणि प्रशासनाने पावले उचलली गेली पाहिजे.

शासनाने प्रशासनाला त्या दृष्टिकोनातून पावला उचलण्याची आदेश दिले गेले पाहिजे, आता वेळ कमी आहे. त्यामुळे नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आवश्यक ती पावले शासनाने उचलली पाहिजे, या सर्व पार्श्वभूमी वरती मी स्वतः महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र सरकारची चर्चा करेल, त्यांना साधुमहंतांची असलेल्या माहितीची देवाण -घेवाण करेल आणि या भागाचा विकास हा झाला पाहिजे आणि दृष्टिकोनातून पावलं उचलली पाहिजे यासाठी चर्चा केली जाईल, असे स्पष्ट करून ते म्हणाले की नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आतापर्यंत जे कुंभमेळा झाले, त्यामध्ये हा एक वेगळा कुंभमेळा असेल.

श्री. स्वामी अधोक्षजानंद देवतिर्थ महाराज म्हणाले, की गोदावरी नदीचे प्रदूषण हे थांबले पाहिजे तसेच आजूबाजूला जी नैसर्गिक हानी केली जात आहे, ती देखील थांबली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून पावले उचलली गेली पाहिजे त्यासाठी शासन स्तरावर ती आवश्यक तो पत्र व्यवहार केला जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com