जो शिवसेना सोडून जातो त्याचे नुकसान ठरलेलेच!

रनाळे येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांच्या हस्ते रस्ता कॉंक्रिटीकरणाचे भूमिपूजन झाले.
जो शिवसेना सोडून जातो त्याचे नुकसान ठरलेलेच!
Adv. Ram Raghuwanshi with BJP leadersSarkarnama

नंदुरबार : जिल्हाप्रमुख आमाश्या पाडवी (Amashya Padvi) यांच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकाची (Shivsena) पक्षाने दखल घेत न्याय दिला. सोडून गेलेल्यांचे नुकसान झाले तर एकनिष्ठ राहिले त्यांना न्याय मिळाल्याची भावना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी (Ram Raghuwanshi) यांनी व्यक्त केली. (those who Loayal to shivsena always get benifited)

Adv. Ram Raghuwanshi with BJP leaders
नुपूर शर्मा किंवा भाजपा म्हणजे भारत नाही!

नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेअंतर्गत एकता चौक ते सुभाष चौकापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन जि.प उपाध्यक्ष ॲड रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, जो शिवसेना सोडून जातो, त्याचे राजकीय नुकसान ठरलेलेच असते. कारण शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे, जो कार्यकर्त्यांना न्याय देतो.

Adv. Ram Raghuwanshi with BJP leaders
राज्यात राज्यसभेच्या एका जागेसाठी आटापिटा करणाऱ्या भाजपला देशात मोठा फटका!

ते पुढे म्हणाले, संकटाच्या काळात धावून जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना. सामान्य शिवसैनिक म्हणून जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांना पक्षाने विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे हे काम फक्त शिवसेनाच करू शकते. शिवसैनिक आमदार होत असल्याची बाब भूषणावह आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न आहेत.

भ्रष्टाचाराचा कलंक पुसला

धुळे-नंदुरबार असा संयुक्त जिल्हा असताना चंदुभैय्यांनी रनाळे गटातून निवडणूक लढविली होती. त्यांनी अध्यक्षपदाच्या पदभार स्वीकारल्यानंतर धुळे जिल्हा परिषदेला लागलेला भ्रष्टाचाराच्या कलंक पुसला असल्याचे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांनी सांगितले.

दिव्यांगांना झेरॉक्स मशिनचे वाटप

कार्यक्रमाप्रसंगी जि.प समाजकल्याण विभागाच्या ५ टक्के सेस निधीतून रनाळे गावातील दोघा दिव्यांग लाभार्थ्यांना झेरॉक्स मशिनचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा बँकेच्या रनाळे शाखाधिकारी गोकूळ नागरे व निरिक्षक अर्जुन नागरे तसेच पं.स शिपाई सीमा चौकोर यांच्या सेवापुर्ती निमित्त सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक दीपक गवते यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे यांनी केले. प्रसंगी सरपंच तृष्णा दीपक गवते,जि.प शकुंतला शिंत्रे,शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,पं.स सदस्य बेगाबाई भिल आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in