महिलांचा अनादर करणाऱ्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा!

येवल्यात सत्यशोधक जनआंदोलनाकडून गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांचा निषेध
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama

येवला : शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात (Maharashtra) महिलांचा आदर करणे (Respect Womens) ही आपली संस्कृती (Culture) आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा महिलांच्या सन्मानासाठी राजीनामा दिला होता. त्यामुळे महिलांबाबत महाराष्ट्रात बेताल वक्तव्य करणारे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) व अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा (Shall resigne) द्यावा अशी मागणी करत येथील सत्यशोधक जनआंदोलनतर्फे या दोघांचा जाहीर निषेध करण्यात आला. (Womens of yeola protest against Abdul Sattar in Yeola)

Abdul Sattar
पदवीधर निवडणूक; काँग्रेसच्या मार्गात `टीडीएफ`चा गतीरोधक?

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील व राष्टवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात मंत्री अब्दुल सत्तार यांनी अवमानकारक शब्द वापरल्याचा निषेध नोंदवत शहरातील विंचूर चौफुलीवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी नगरसेविका चहाबाई अस्वले, देवयानी कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मंत्री पाटील, सत्तार यांचा निषेध करत राजीनाम्याची मागणी केली.

Abdul Sattar
भाजप कार्यकर्ते म्हणतात,`आम्हाला उमेदवारी मिळेल की नाही`

छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच महिलांचा सन्मान केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना सन्मान देणारे हिंदू कोड बील संसदेत मंजूर झाले नाही, म्हणून आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे घेऊन सत्तेत बसलेले मंत्रीपदाची गरीमा न बाळगता सातत्याने महिलांचा अवमान करत आहेत. मनुवादी प्रवृत्ती जोपासत आहे. महाराष्ट्र ही बाब सहन करणार नाही, असा इशाराही ज्येष्ठ कॉम्रेड नेते किशोर जाधव यांनी दिला.

कॉ. भगवान चित्ते, काजल जाधव यांनीही मंत्री पाटील, सत्तार यांच्यासह मनुवादी प्रवृत्तीवर जोरदार टीका केली. असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा आणि जनतेनेही अशा मनमानी करणाऱ्यांना धडा शिकवावा असेही चित्ते म्हणाले. या आंदोलनात सुंदराबाई जाधव, सुनिता जाधव, रवी खैरनार, नचिकेत जाधव, नाना गुंजाळ, हेमंत भुजबळ, प्रतिक्षा कांबळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com