पाण्याच्या प्रश्नावर जळगामध्ये ‘नो पार्टी डिफरन्स’ हीच भूमिका!

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सरपंचांचा मेळावा
Gulabrao Patil, Jalgaon
Gulabrao Patil, JalgaonSarkarnama

जळगाव : केंद्राच्या योजना राज्यापर्यंत आणि राज्याचा निधी जिल्हा व गावपातळीपर्यंत पोचविण्याचे काम आम्ही करू. तो निधी उपयोगात आणायची किमया सरपंचांनी साधली पाहिजे. पाणीपुरवठामंत्री या नात्याने मी पाणी योजना घेऊन येणाऱ्यांना त्यांची ‘पार्टी’ विचारत नाही आणि विचारणारही नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले.

Gulabrao Patil, Jalgaon
देशाचे राजकारण करायचे अन् गावातला सरपंच ऐकत नाही!

सरपंच परिषद, मुंबईच्या वतीने जळगावात आयोजित सरपंच मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यात आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी व्यासपीठावर सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे, खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, आमदार मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Gulabrao Patil, Jalgaon
ओबीसी समाजास हक्कापासून वंचित ठेवून चालणार नाही

गावच्या विकासाची कास धरली तर सरपंचांचा लौकिक वाढेल. केवळ राजकारण न करता ग्रामपंचायत अधिनियमाचा अभ्यास करावा. गावात पाण्याची समस्या दूर केली तरी सरपंच पुढच्या वेळी निवडून येईल. पोपटराव पवार गावचे सरपंच असूनही देशाला माहिती झाले, आपण जिल्ह्यातील पोपटराव व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

अभ्यासू सरंपच व्हा

सत्काराला उत्तर देताना पोपटराव पवार म्हणाले, की कोणत्याही योजना आली, की त्यावर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा सर्वानुमते ती योजना गावात कशी यशस्वी होईल, याचा विचार सरपंचांसह सर्वांनीच करावा. विकासाची मानसिकता ही सर्वांत मोठी समस्या आहे. विकासासाठी आर्थिक बाब ही समस्या नसते. श्रमदानाद्वारे अनेक योजना पूर्ण करता येतात.

समाज पूर्वीही चांगला होता. समाज आजही चांगला आहे. कामे करताना हेतू चांगला असेल, तर सर्वांचेच सहकार्य मिळते. अभ्यासू सरपंच व्हा. गावाच्या समस्यांची कुंडली करा, त्या सोडवा. गाव व यंत्रणा प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या पाठीशी असते. मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार उन्मेष पाटील व मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यात सरपंच भवन उभारण्याचा मानस व्यक्त केला. त्यावर भाष्य करताना गुलाबराव पाटील यांनी सरपंच भवनासाठी जिल्हा नियोजन समितीतून ५० लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com