Jalgaon News: महापौरांच्या घरावर हल्ला झालाच नाही, फक्त गुलाल उधळला!

राजकीय द्वेषातून आमच्या पोरांना अडकविल्याची मेहरूणच्या महिलांची पोलिस अधीक्षकांकडे माहिती.
Womens at Police Office
Womens at Police OfficeSarkarnama

जळगाव : गणेश विसर्जनाच्या (Ganesh immersion) दिवशी महापौर जयश्री महाजन (Mayor Jayshree Mahajan) यांच्या घरावर हल्ला (Attack on Hpuse) करून दगडफेकीसह पेटते सुतळी बाँब फेकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वस्तुस्थिती मात्र पूर्णतः वेगळी असून, महाजन दांपत्याकडून राजकीय द्वेषापोटी (Political hatred) दंगलीसह कलम ३०७ सारखा गंभीर गुन्ह्यात आमच्या शिक्षण घेत असलेल्या पोरांना अडकविण्यात आले आहे. याप्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन मेहरूणसह समस्त लाडवंजारी समाजातील महिलांनी पोलिस अधीक्षक (Police) डॉ. प्रवीण मुंढे (Dr. Pravin Munde) यांना प्रत्यक्ष भेटून दिले आहे. (Guardians of youth arrested by police in Mayor House attack refuses all accusation)

Womens at Police Office
Congress News: `फॉक्सकॉन`विषयी ९० टक्के चर्चा झाली होती!

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर काही तरुणांनी हल्ला चढवून दगडफेक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्ह्यात सोमवारी (ता. १२) सात संशयितांनी स्वतःहून पोलिसांत हजर होत स्वतःची अटक करवून घेतली. गुन्हे दाखल असलेल्या या मुलांच्या पालकांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेत निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान श्रीराम मित्रमंडळ व ‘एक गाव-एक गणपती’ मित्रमंडळ यांच्यात शाब्दिक वाद झाले होते. त्या वेळी महापौर जयश्री महाजन यांनी माध्यमांसमोर येत मंडळातील कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. या प्रकरणात २५ ते ३० जणांविरुद्ध दंगलीसह प्राणघातक हल्ला (कलम ३०७) च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Womens at Police Office
Nashik News: नाशिक झाले यूपी- बिहार, पोलिसांचा वचक संपला?

प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. ज्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यातील काही जण शिक्षण घेत असून, तर काही जण मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावतात. तसेच त्यांच्यावर आजपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही अठरा मुलांची यादीच संबंधितांनी पोलिसांना दिली. केवळ द्वेषापोटी त्यांना या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. तरी पोलिसांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मागणी संशयितांच्या नातेवाइकांसह समस्त लाडवंजारी समाजातील महिलांतर्फे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनावर अलका नाईक, संगीता सांगळे, मंगलाबाई वंजारी, स्वाती वाघ यांच्या स्वाक्षरी आहेत. खटला न लढविण्यासाठी दबाव ज्या तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्याकडून कुणीही खटला लढू नये. यासाठीही विशिष्ट गटातर्फे वकील संघावरही दबाव आणला जात असल्याचा आरोप लाडवंजारी समाजातील महिलांनी निवेदनाद्वारे केला आहे. -------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in