ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही निवडणुका नकोत

भारतीय जनता पक्षातर्फे ओबीसी आरक्षणाचा जागर करण्यात आला.
BJP Agitation at Niphad
BJP Agitation at NiphadSarkarnama

निफाड : जोपर्यंत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ अशी मागणी भारतीय जनता पक्ष (BJP) ओबीसी मोर्चातर्फे तहसीलदारांकडे प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ, (Shankarrao Wagh) भाजप तालुकाध्यक्ष भागवत बोरस्ते, विधानसभा अध्यक्ष यतीन कदम, जिल्हाध्यक्ष संजय शेवाळे आदींनी निवेदन दिले.

BJP Agitation at Niphad
राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटेंच्या बैठकीतून शेतकरी निघून गेले

भारतीय जनता पक्षातर्फे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर निफाड येथे जागर करण्यात आला. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे स्थगित झाले, राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात उशिरा दाखल केलेला अध्यादेश सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. राज्य सरकारला एक महिन्यात एम्पिरिकल डेटा गोळा करून सुप्रीम कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले. यामध्ये राज्य सरकारने तातडीने उपाययोजन करण्याची मागणी करण्यात आली.

BJP Agitation at Niphad
समीर भुजबळ ठरले नाशिकच्या संमेलनाचे यशस्वी किमयागार!

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी रमेश आहेर, पंढरीनाथ पिठे, चेतन दरगुडे, आदेश सानप, जनार्दन कराड, मयूर कापसे, अंबादास बोडके, संजय गाजरे, आदेश सानप, सचिन धारराव, दिलीप मंडलिक, अण्णासाहेब आंबेकर, बापू माळी, अरबाज पठाण आदी उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com