Uddhav Thackeray News : राठोड, कदम, गोगावलेंनंतर आता दादा भुसेंचा नंबर; ठाकरेंनी डाव टाकला

Uddhav Thackeray News : शिवसेनेत मोठा नेता प्रवेश करणार आहे...
Uddhav Thackeray, Dada Bhuse
Uddhav Thackeray, Dada BhuseSarkarnama

Uddhav Thackeray News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदार संघात त्यांना घेरण्यासाठी रणनीती तयार केली आहे. मंत्री दादा भूसे (Dada Bhuse) यांच्या मतदार संघातही ठाकरेंनी मोठा नेता गळाला लावत त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

नाशिकमध्ये खासदार संजय राऊत यांनी दोन वेळा दौरा केला. पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पक्षाला भरारी देण्यासाठी त्यांनी महत्वाचे प्रयत्न केले आहेत. त्यातच त्यांनी भाजपच्या नेत्याला आपल्या गटाकडे वळवण्यात यश मिळवले आहे. नाशिकमधील माजी मंत्री प्रशांतदादा हिरे यांचे पुत्र, भाजप युवा मोर्चाचे नेते डॉ. अद्वय हिरे हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात प्रवेश करणार, असल्याची माहिती आहे.

Uddhav Thackeray, Dada Bhuse
Konkan News : कोकणात भाजप-राष्ट्रवादी एकत्र : आमदार नीतेश राणे उतरले प्रचाराच्या मैदानात

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाला धक्के बसले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाने भाजपला (BJP) मालेगावमध्ये मोठा धक्का दिला आहे. याचबरोबर हिरे यांच्या ठाकरे गटात प्रवेशानंतर दादा भुसे यांच्या समोर देखील आव्हान निर्माण होणार आहे. त्यामुळे आता मंत्री, संजय राठोड आणि आमदार योगेश कदम, आमदार भरत गोगावले यांच्यानंतर आता दादा भूसे यांच्या मतदार संघात ठाकरेंनी लक्ष दिले आहे.

भाजप नेते अद्वय हिरे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने भाजपला हा मोठा धक्का आहे. हिरे यांनी रविवारी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीत हिरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून याबाबत कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली. बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमताने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करण्यासंदर्भात प्रतिसाद दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Uddhav Thackeray, Dada Bhuse
Devendra Fadanvis : जुनी पेन्शन योजना, शिक्षकांचे प्रश्न हे काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे पाप, ते आम्ही सोडवू...

हीरे यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला उभारी मिळणार आहे. भुसे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाची रणनीती असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये मालेगावात दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे असा सामना होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com