मालेगावच्या विकासात कोणताही दुजाभाव नाही

पालकमंत्री दादा भुसे यांची पत्रकार परिषदेत माहिती
Dada Bhuse & Maulana Mufti
Dada Bhuse & Maulana MuftiSarkarnama

मालेगाव : तत्कालीन नगरविकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मार्चमध्ये मालेगाव (Malegaon) दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे शहर विकासासाठी शंभर कोटी (100 cr. Fund) निधीची मागणी करण्यात आली होती. सदर निधी त्यांनी मंजूर केल्याने शहरातील विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. शहर विकास साधताना पूर्व व पश्‍चिम असा कोणताही दुजाभाव केला जात नाही. विरोधक जनतेची दिशाभूल करीत असल्याची स्पष्टोक्ती पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली. (Dada Bhuse refuse any inferior treatment for malegon devolopment)

Dada Bhuse & Maulana Mufti
सावरकरांच्या जन्मभूमीत राष्ट्रवादीने अब्दुल सत्तार यांची खोक्यांसह तिरडी काढली!

येथील हबीब लॉन्समध्ये सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, हाजी हुसेन अश्रफी, राजेश गंगावणे आदी उपस्थित होते.

Dada Bhuse & Maulana Mufti
राज ठाकरेंच्या ड्रिम प्रोजेक्टची महापालिकेने केली दुरावस्था

श्री. भुसे म्हणाले, शहरात १०० कोटींची विकासकामे होत आहेत. ही आनंदाची बाब आहे. शंभर कोटीतून ८९ कोटींची विकासकामे शहरात केली जातील. विरोधक या कामाचा हिशेब लावतील. शंभरपैकी १३ कोटी रुपये जीएसटी व इतर टॅक्सपोटी शासनाला भरावे लागणार आहेत. शंभर कोटीपैकी राज्य सरकार ७० व ३० टक्के महापालिका निधी देणार आहे.

मिल्लत मदरसा ते ओवाडी नाला, जुनी ताज हॉटेल ते मुमताज चौक, मिर्झा गालिब रोड ते ट्रॉली चौक, स्लॉटर हाऊस, राजा चौक, बिस्मिल्ला चौक ते ओवाडी नाल्यापर्यत सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम दर्जेदार केले जाणार आहे. येथील रस्ते २५ वर्ष टिकतील अशा स्वरुपाचे काम केले जाईल. रस्त्याच्या कामात कुठल्याही कमतरता आढळल्यास नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे, असेही ते म्हणाले.

...तर ठेकेदार काळ्या यादीत

कॉलेज मैदानावरील जॉगिंग ट्रॅकसंदर्भात शहरात राजकारण केले जात होते. मात्र, आम्ही विकासात कुठेही कमी पडणार नाही. अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्याच्या कामासाठी साडेपाच कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. भूमिगत गटारीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम जानेवारी- फेब्रुवारीत सुरु केले जाणार आहे. २०१७ मध्ये उड्डाण पुलाच्या कामासाठी २२ कोटी रुपये मंजूर केले होते. ५ कोटी रुपयांची वाढ या कामासाठी होणार आहे. ठेकेदाराने पाच महिन्यात काम केले नाही तर त्याला काळ्या यादीत टाकून त्याच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in