पाणी हे जीवन असते, ते जात, धर्म व पंथ मानत नाही.

सप्तशृंगगड येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पाणी हे जीवन असते, ते जात, धर्म व पंथ मानत नाही.
Gulabrao PatilSarkarnama

कळवण : (Nashik) पाणी जात, धर्म व पंथ मानत नाही. त्यामुळे दुरुस्तीसाठी अडीच कोटी रुपये मंजूर झालेली सप्तशृंगगडावरील पहिली योजना असून, सप्तशृंगगड संपूर्ण महाराष्ट्राचे अधिष्ठान आणि वैभव आहे. गडावर दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असल्यामुळे सप्तशृंगगडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली. (Gulabrao Patil sanctions water supply scheme for Saptshrungi Temple)

Gulabrao Patil
नुपूर शर्मा किंवा भाजपा म्हणजे भारत नाही!

जलजीवन मिशनअंतर्गत सप्तशृंगगडावर नऊ कोटी २३ लाखांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

Gulabrao Patil
राज्यसभेच्या विजयानंतर फडणवीसांनी दिला विधानपरिषदेच्या यशाचा कानमंत्र

पाणीपुरवठामंत्री पाटील म्हणाले, की सप्तशृंगगडावर रोज ७५ हजार नागरिक असतील, अशा अंदाजाने ही पाणीयोजना तयार केली असून, यात्रा उत्सवांचाही विचार केला आहे. या पाणीयोजनेच्या माध्यमातून अडीच लाख लिटरचा जलकुंभ, दिवसाला २२ लाख लिटर शुद्ध पाणी होईल, असा जलशुद्धीकरणाचा प्रकल्प तयार होणार आहे. भवानी पाझर तलावाच्या माध्यमातून येथे काम होणार आहेत.

सिमेंट बंधारा, सूर्यकुंड व गंगा- जमुना विहिरींचाही वापर या योजनेसाठी होणार आहे. वीजबिलाची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी सोलर प्रणालीचा समावेश केला आहे. जलजीवन मिशनअंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी विशेष तरतूद केली आहे. या अंतर्गत महाराष्ट्रात २८ हजार गावांना नळाद्वारे पाणी पोचविण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. त्यानुसार डीपीआर तयार केले असून, पहिल्या टप्प्यातील कार्यारंभ जुलैपर्यंत देण्यात येणार आहेत, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

आमदार नितीन पवार म्हणाले, की सप्तशृंगगडावर निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन नवीन योजनेसाठी मंत्रालयात आपल्यासमवेत तीन बैठका झाल्या. तिसऱ्या बैठकीत मंत्री पाटील यांनी यंत्रणेला तीन महिन्यांत योजनेचा अंतिम प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्याच्या सूचना दिल्या. या योजनेला नऊ कोटी २३ लाखांच्या खर्चाला मान्यता मिळाली. कळवण व सुरगाणा मतदारसंघासाठी १६४ कोटींच्या पाणीयोजनांना श्री. पाटील यांनी मंजुरी दिल्याने त्यांचे आभार मानले.

यावेळी आमदार नितीन पवार अध्यक्षस्थानी होते. आमदार नरेंद्र दराडे, कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शिवसेनेचे नेते कारभारी आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष संदीप वाघ, सरपंच रमेश पवार, उपसरपंच मनीषा गवळी, देवी ट्रस्टचे विश्वस्त ॲड. ललित निकम, ॲड. दीपक पाटोदकर, पाणीपुरवठा विभागाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे, तहसीलदार बंडू कापसे आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in