Sambhajiraje On Chhagan Bhujbal : येवल्यात वीस वर्षांत केले तरी काय?

There is no basic devolopment in Yeola constituency-स्वराज्य पक्षप्रमुख संभाजीराजे यांनी लासलगाव येथे शेतकरी संघर्ष सभेत बोलताना येवल्यात विकासाचा अभाव असल्याची टीका केली.
Sambhajiraje & Chhagan Bhujbal
Sambhajiraje & Chhagan BhujbalSarkarnama

Sambhajiraje News : गेली अनेक वर्षे विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळलेल्या आणि येवला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या कार्यपद्धतीवर संभाजीराजे यांनी खरमरीत टीका केली. येथे मूलभूत विकासाचा अभाव असल्याचे त्यांनी सांगितले. (Sambhajiraje asks, what ministers have work in last 20 years)

स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी लासलगाव (Yeola) येथे सभा घेतली. या वेळी त्यांनी येथे प्रक्रिया उद्योग का उभारण्यात आले नाहीत, असा प्रश्न केला. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याविरोधात टीका केली.

Sambhajiraje & Chhagan Bhujbal
Girish Mahajan Statement: शरद पवार म्हणाले होते, ‘तुम्ही काळजी करू नका, आम्ही भाजपच्या पाठीशी’

छत्रपती संभाजीराजे यांनी येथील स्थानिक प्रश्नांना हात घालत २० वर्षांपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असूनही अद्याप येवल्यात विकासगंगा नसल्याचे सांगत भुजबळांचे कान टोचले.

ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून इथले प्रतिनिधी मंत्रिपदे उपभोगत आहेत. मात्र, येवल्यात ना शिक्षण संस्था, ना एमआयडीसी, ना कांद्याचे प्रोसेसिंग युनिट; मग २० वर्षांत नेमके काय केले?, असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी येथे झालेल्या शेतकरी संघर्ष सभेत केला.

Sambhajiraje & Chhagan Bhujbal
Nashik Shivsena News : बबनराव घोलप यांनी शिवसेनेत आपला खुंटा पक्का केला?

स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, नाही तर २०२४ दूर नाही, अशा शब्दांत छत्रपती संभाजीराजे यांनी थेट छगन भुजबळ यांनाच आव्हान देत, संभाजीराजे म्हणाले की, आज नाशिक जिल्ह्यात आल्यानंतर येवला मतदारसंघात फिरलो. अनेक गावांना भेटी दिल्या. येवल्यात अनेक प्रश्न आहेत. मात्र, विरोधकही प्रश्न विचारत नाहीत.

लासलगावमध्ये कांद्याची मोठी बाजारपेठ असताना कांद्याचे प्रोसेसिंग युनिट का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. येथील मंत्री येवल्याच्या विकासासाठी सत्तेत गेले. आता नऊ महिन्यांत येवल्याचा काय विकास साधणार काय माहीत, असा खोचक टोला भुजबळांना लगावला. एमआयडीसी बघण्यासाठी गेलो, तर एमआयडीसी सापडलीच नाही. तेथे जवळपास ३५० एकर जागा पडून आहे. त्यासाठी जिंदाल व उद्योगमंत्री उदय सामंत यांना इथे बोलवणार आहे.

Sambhajiraje & Chhagan Bhujbal
Girish Mahajan News : वादग्रस्त पोस्ट टाकल्याने धुळ्यात डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल!

या वेळी करण गायकर, धनंजय जाधव, विनोद साबळे, महादेव देवसरकर, संजय पवार, प्रा. उमेश शिंदे, राहुल शिंदे, नवनाथ वैराळ, प्रदीप रायते, रोहिदास पवार, सुनील काळे, केशव गोसावी, शिवाजी मोरे, नवनाथ शिंदे, पुष्पाताई जगताप, मनोरमा पाटील, ज्ञानेश्वर भोसले आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in