Jalgaon News: महापालिकेत दोन आयुक्त, खुर्चीवर मात्र कोणीच नाही

जिल्ह्यात दोन मंत्री, तरीही महापालिका आयुक्त कोण हा पेच सुटेना
Girish Mahajan & Gulabrao Patil
Girish Mahajan & Gulabrao PatilSarkarnama

जळगाव : महापालिकेत सद्यःस्थितीत दोन आयुक्त आहेत. मात्र, खुर्चीवर एकही आयुक्त बसलेले दिसत नाहीत. अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासकीय घोळात कोणताही कामाचा ताळमेळ जमत नसल्याने सध्या तरी प्रशासकीय दृष्टीने महापालिका(Municipal Corporation) वाऱ्यावर आहे. मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत वानखेडे एकमेव अधिकारी सध्या महापालिकेत सर्वच विभागांचे काम पाहात असल्याचे दिसून येत आहे. (Appointment of municipal commissioner issue pending in Jalgaon)

Girish Mahajan & Gulabrao Patil
Chitra Wagh; चित्रा वाघ यांनी दिली महागाईची कबुली!

जळगाव(Jalgaon) महापालिकेचे आयुक्तपद अनोख्या पेचात अडकले आहेत. डॉ. विद्या गायकवाड यांच्या झालेल्या बदलीला स्थगिती आहे. मात्र, त्यांना पदभार घेता येत नाही. रुजू झालेले आयुक्त देवीदास पवार यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार आहे. मात्र, त्यांनी धोरणात्मक निर्णयावर स्वाक्षरी करावयाची नाही. याबाबत शासनाचे कोणतेही ठोस आदेश नाहीत, अशा कठीण परिस्थितीत महापालिकेत दोन्ही आयुक्तांपैकी एक आयुक्त त्यांच्या दालनात खुर्चीवर बसलेले दिसत नाहीत.

Girish Mahajan & Gulabrao Patil
Dada Bhuse; पालकमंत्री दादा भुसेंवर गुन्हा दाखल करा!

महापालिकेत नवीन रुजू झालेले आयुक्त देवीदास पवार सोमवारी दुपारनंतर आपले कार्यालय सोडून गेले आहेत. ते मंगळवारी आले नाहीत. ते कोणत्या कामासाठी बाहेर आहेत, याबाबत कोणीतीही माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत दोन दिवस आयुक्त कार्यालयातून कोणत्याही फाइलवर सही झाली नसल्याचे सांगण्यात आले.

डॉ. गायकवाडांना आदेशाची प्रतीक्षा

डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीला ‘मॅट’ने स्थगिती दिली आहे. मात्र, त्यांनी पदभार घ्यायचा की नाही, याबाबत कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे त्यात आदेश येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिकेत दोन्ही आयुक्तांना पदभार घेता येत नाही. शहर अभियंता गिरगावकर रजेवर आहेत. उपायुक्त प्रशांत पवार यांची बदली झाल्याने ते निघून गेले आहेत. सहाय्यक आयुक्त बाविस्कर यांचे लग्न असल्यामुळे ते सुटीवर आहेत. त्यामुळे सध्या मुख्य लेखाअधिकारी चंद्रकांत वानखेडे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सध्या सर्वच विभागांचा प्रभारी पदभार आहे. मंगळवारी त्यांच्या उपस्थितीत शहरातील गोवरच्या साथीबाबत बैठकही घेण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com