शीतल नवले संतापले, `आयुक्त परस्पर निर्णय घेतात कसे`

सभापतींच्या निर्णयांना केराची टोपली दाखविल्याने सभापती शीतल नवले संतप्त झाले.
Dhule Municiple corporation
Dhule Municiple corporationSarkarnama

धुळे : महापालिका (Dhule) आयुक्त परस्पर निर्णय घेतात, आपल्याला कळवतदेखील नाही. तसेच फाईलींवर स्वाक्षरी करत नाहीत, आपल्या निर्णयांना केराची टोपली दाखवतात, असा संताप व्यक्त यापुढच्या सभेला आयुक्त उपस्थित राहिले नाहीत तर त्यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव आणू, असा इशाराच स्थायी समिती सभापती शीतल नवले (Sheetal Navale) यांनी दिला. (Dhule Standing committee chairmen unhappy with commissioner`s working)

Dhule Municiple corporation
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा; अडीच वर्षांनंतर 'मविआ' सरकार पायउतार

दरम्यान, सभेत केवळ चर्चा होतात, निर्णय होतात अंमलबजावणी होत नाही, अधिकारी- कर्मचारी काहीही कामे करत नाहीत, केवळ पगार घेतात, असा संतापही सदस्यांनी केला. शहरात काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीही सदस्यांनी केल्या. मनपा स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी झाली. सभापती नवले, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

Dhule Municiple corporation
एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा होताच बंडखोर आमदार बेभान होऊन नाचले!

आठ कोटींचे वेतन

सभेत सत्ताधारी भाजपचे सदस्य हर्षकुमार रेलन यांनी मलेरिया विभागाशी संबंधित प्रश्‍न विचारत आपल्या प्रभागात शीतल कॉलनीमध्ये ठिकठिकाणी डबके साचले आहेत. एका मुलीला डेंगी झाला आहे. त्यामुळे मलेरिया विभाग नेमकं काय काम करत आहे. स्वच्छता कर्मचारी थातूरमातूर काम करतात, सकाळी साडेआठनंतर तर ते कुठेही सापडणार नाहीत. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगारावर दरमहा आठ कोटी रुपये खर्च होतात. मात्र, कुणीही काम करत नाही.

प्रभागातील समस्यांबाबत नागरिक आम्हाला विचारणा करतात. कारण आम्ही त्यांना सहज उपलब्ध होतो. अधिकाऱ्यांना कुणीही विचारत नाही. सदस्य किरण अहिरराव यांनी हद्दवाढ क्षेत्रातील रस्त्यांवर मुरुम टाकण्याचे आयुक्तांनी जाहीर केल्याचे समजले. त्यांनी हा निर्णय घेताना आम्हाला विश्‍वासात घेतले नाही. सदस्य नरेश चौधरी यांनीही मुरुम टाकण्याबाबत खुलासा करण्याची मागणी केली.

सभापती नवले संतप्त

सदस्यांच्या तक्रारींचा धागा पकडत सभापती नवले यांनी आयुक्त परस्पर निर्णय घेतात, फंडातील कामांवर स्वाक्षरी करत नाहीत, आपल्या निर्णयांना केराची टोपली दाखवतात. बजेटमधील कामेही बाजूला ठेऊन देतात. त्यामुळे त्यांच्यावर अविश्‍वास ठराव घेऊन या त्यासाठीच्या पत्रावर मी प्रथम सही करतो. दरम्यान, आयुक्तांना सभेला का बोलावत नाही, आम्ही त्यांना प्रश्‍न विचारतो, असे सदस्य साबीर शेठ म्हणाले. त्यावर पुढची सभा आयुक्तांशिवाय होणार नाही, ते नसतील तर अविश्‍वास ठराव आणू असा इशारा श्री. नवले यांनी दिला. कामे करायचे नसतील तर अधिकाऱ्यांनी रजेवर जावे, आम्ही दुसरे अधिकारी आणू असेही ते म्हणाले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com