...तर माझी मालमत्ता गिरीश महाजनांना दान करेन!

तर ती मालमत्ता मी महाजनांना दान करेन, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिले आहे.
Eknath Khadse-Girish Mahajan
Eknath Khadse-Girish MahajanSarkarnama

जळगाव : गिरीश महाजन म्हणतात, (Girish Mahajan said) एकनाथ खडसेंचे शंभर उतारे माझ्याजवळ आहेत. (I have 100 property cards of Eknath Khadse) मी त्यांना आव्हान देतो की, प्राप्तीकर विभागाला सादर केलेल्या विवरणपत्रात ( if i founf a single rupee property excess then Shown in It Return) दाखविलेल्या माहितीपेक्षा एक रुपयाची जरी मालमत्ता अधिक असली, तर ती मालमत्ता मी महाजनांना दान करेन, ( I will donat that property to Girish Mahajan) असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

Eknath Khadse-Girish Mahajan
शिवसेनेत येण्यास सर्व पक्षांचे दिग्गज नेते उत्सुक

श्री खडसे यांच्या विरोधात भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्याचा श्री. खढसे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खडसे यांच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र आहे. पुणे येथीस भोसरी जमीन व्यवहारामुळे ते `ईडी` कडून पुन्हा एकदा त्यांची चौकशी सुरु झाल्याने ते अडचणीत आहेत. त्यातच राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या पत्र दिले आहे. या पार्श्वभूमीवर श्री. खडसे यांनी केलेल्या विधानाला महत्त्व दिले जात आहे.

Eknath Khadse-Girish Mahajan
नाशिक महापालिकेची निवडणूक छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली!

ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यावर भारतीय जनता पक्षातील गद्दार कोण आहे, ते मला कळालं. त्यांनी अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अतिशय कठोर शब्दात टीका केली. `मी भाजपमध्ये असताना मला अप्रत्यक्षरित्या त्रास देणारे कोण?. हे मला समजले नव्हते. मात्र आता भाजपमधील गद्दार कोण होते हे मला समजले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यावर भाजपमध्ये कोण कोण गद्दार होते, माझ्या मुलीचा पराभव कोणी केला हे मला कळाले आहे.

Eknath Khadse-Girish Mahajan
Eknath Khadse-Girish MahajanSarkarnama

ते पुढे म्हणाले, आज मुख्यमंत्री शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अगदी तसेच मी येथील आमदारांना मी सांगतो की, तुम्ही कोणाच्या बळावर निवडून आला आहात. पण कुणाचं तरी ऐकायचं आणि नाथाभाऊच्या मागे ईडी लावायची. कधी लाच लुचपत प्रतिबंधख विभागात तक्रारी करायच्या. चौकशी लावायची, कधी प्राप्तीकर विभागाची चौकशी लावायची. माझ्या घरावर दोन वेळा इन्कम टॅक्सची तपासणी झाली. रेड झाल्या. मात्र त्यात तक्रारीत काहीही तथ्य आढळले नाही. न्यायालयात देखील तसा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानंतर देखील पुन्हा ईडीची चौकशी सुरु करण्यात आली.

यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. ते म्हणाले, माझा राजकीय छळ करण्यात आला. हे सर्व घडले ते एकाच व्यक्तीच्या सांगण्यावरुन बदनामीचे कारस्थान घडले. तो गद्दार कोण हे मला कळले आहे. गुगलवर जाऊन `टरबूज ऑफ महाराष्ट्र` सर्च केले की, त्या गद्दाराचे नाव कळेल!

श्री. खडसे म्हणाले, गिरीश महाजन यांनी आपल्याकडे खडसे यांचे शंभर उतारे आहेत असा दावा केला आहे. त्यालाही त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. महाजन यांना मी आव्हान देतो की, माझ्या कौटुंबिक मालमत्तेवर मी जे कमविले असेल, ते प्राप्तीकर विभागाच्या विवरणात आहे. त्याहून एक रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता असली तरी मी तुम्हाला दान करून टाकेन.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com