Amit Thakre: ...तर मी देखील राजकारणात आलो नसतो!

अमित ठाकरे यांनी मनमाड येथे मनसेचे शहराध्यक्ष सचिन शिरूड यांच्याशी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसंदर्भात चर्चा केली.
Amit Thakrey
Amit ThakreySarkarnama

मनमाड : सध्याचे राजकारणात (Politics) जे सुरु आहे, त्याबाबत जनतेत चांगला संदेश गेलेला नाही. त्याकडे बघता राजकारणाकडे कोणी वळणार नाही. मी बाहेर असतो तर मीही राजकारणाकडे वळलो नसतो, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण (MNS) विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thakrey) यांनी व्यक्त केले. (Todays Politics reached at worst lavle)

Amit Thakrey
Amit Thakrey: युवकांना नोकरभरतीसाठी मार्गदर्शन करू !

अमित ठाकरे रविवारी मनमाडच्या दौऱ्यावर आले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थी व युवा वर्गाशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधतांना अमित ठाकरे यांनी सांगितले की, हा दौरा केवळ मनविसेची पुनर्बांधणी करण्यासाठी असून, विद्यार्थी व युवा वर्गाशी संवाद साधण्यासाठी आहे.

Amit Thakrey
Congress: देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात संघाचे योगदान किती?

राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनात काम करण्यासाठी अनेक युवा उत्सुक असल्याचे या दौऱ्यादरम्यान दिसत असल्याचे ते म्हणाले. सध्याचे राजकारण बघता तरुणांनी राजकारणात यावे का, असा प्रश्‍न विचारला असता त्यांनी ‘मी जर बाहेर असतो तर मी देखील इकडे वळलो नसतो’, असे उत्तर दिले.

ठाकरे घराण्यावर संकट असल्याविषयी प्रश्‍न विचारला असता त्यांनी यावर बोलण्याचे टाळत राज ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. राज ठाकरेंनी यावर आपले मत व्यक्त केले आहे आणि त्या मताशी आम्ही, सहमत आहोत. मनविसे वाढवण्याच्या दृष्टीने ‘सकारात्मक ऊर्जा घेवून दौरा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मनमाड शहराच्या संघटन बांधणीसंदर्भात मनसेचे शहराध्यक्ष सचिन शिरूड यांच्याशी संवाद साधला. त्यांना संघटन बांधणीसाठी मार्गदर्शन केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com