..तर 'त्या' आमदारांची नियुक्ती निवडणुकीनंतर करा...

Bhagat Singh Koshyari : अनेक निर्णयांना सरकारने स्थगिती दिली आहे. तेच तत्व वापरून या यादीलाही स्थगिती द्यावी
Anita Bhamre & Bhagat Singh Koshyari Latest News
Anita Bhamre & Bhagat Singh Koshyari Latest NewsSarkarnama

नाशिक : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार गेली अडीच वर्ष सत्तेत असतांना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पाठवलेली राज्यपाल नियुक्त आमदार यादीवर शिक्कामोर्तब करा, अन्यथा पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत यादीला स्थगिती द्यावी,अशी मागणी राष्ट्रवादी (NCP) महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी केली आहे. (Anita Bhamre & Bhagat Singh Koshyari Latest News)

Anita Bhamre & Bhagat Singh Koshyari Latest News
Shiv Sena : शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक दणका ; राज्यपालांकडून ठाकरेंच्या यादीला केराची टोपली

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतांना तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १२ आमदारांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना सर्व संमतीने पाठवली होती. मात्र राज्यात भाजपचे सरकार नसल्याने राज्यपाल महोदयांनी हेतुपुरस्कर यादी मंजूर केली नाही,असा आरोप भामरे यांनी केला.

आता शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्याने मागील यादी रद्द करून नवीन यादी मुख्यमंत्री महोदयांनी निश्चित केली आहे. नवीन यादी मंजूर केल्यास जून्या यादीतील नावांवर अन्याय होणार आहे. जून्या यादीत कला, विज्ञान, साहित्य, सहकार आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातील दिग्गज नावांचा समावेश होता. केवळ विरोधाला विरोध म्हणून राज्यपालांची कृती घटनेला तिलांजली देण्यासारखी होईल. राज्यपाल महाराष्ट्राचे प्रथम नागरिक असून घटनेने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली निश्चितच करणार नाही अशी अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेची आहे, असे भामरे म्हणाल्या आहेत.

Anita Bhamre & Bhagat Singh Koshyari Latest News
दसरा मेळावा : पंकजा मुंडेसारखी वेळ उद्धव ठाकरेंवर येणार का?

राज्यपाल महोदयांनी एक तर जुन्याच यादीला मान्यता द्यावी नाहीतर २०२४ च्या विधानसभा निवडणूका होईपर्यंत नवीन यादीला स्थगिती द्यावी. नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर अनेक निर्णयांना सरकारने स्थगिती दिली आहे. तेच तत्व वापरून या यादीलाही स्थगिती द्यावी, असा टोणणा देखील त्यांनी राज्यपालांना लगावला.

दरम्यान, राज्यात सत्तातर झाल्यानंतर आघाडी सरकारला शह देण्यासाठी राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादी रद्द केली जाईल, याबाबतची चर्चा अखेर खरी ठरली आहे. ठाकरे सरकारने राज्यपालांना पाठवलेली यादी रद्द समजावी,असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पाठवले होते, ही यादी रद्द करण्यात आल्याचे पत्र राजभवनाकडून मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. यामुळे विरोधक आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in