'वेदांता फॉक्सकाँन'चे सत्य चौकशीतून समोर आणू...

Eknath Shinde : मी आणि फडणवीसांनी आव्हान स्वीकारले आहे.
Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest NewsSarkarnama

जळगाव : 'वेदांता फॉक्सकाँन'ला महाविकास आघाडी सरकारने कोणतेही सहकार्य केले नाही. त्यामुळेच ती कंपनी बाहेर गेली आणि ते आमच्यावर खापर फोडत आहेत. परंतु याची चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी करू, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला आहे. काल मुक्ताईनगर येथे सभेत ते बोलत होते.

मुक्ताईनगर येथे क्रिडा संकुल मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप (BJP) नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार बच्चू कडू, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लताताई सोनवणे आदी उपस्थित होते. (Eknath Shinde Latest News)

Eknath Shinde Latest News
शिवसेनेला रोज संजय राऊत यांची आठवण... तोडीस तोड उत्तर देणाऱ्या नेत्याची वाणवा

एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्हाला ट्वेन्टी- 20 खेळायची आहे, कमी वेळेत जास्त रन काढायचे आहेत. मी आणि फडणवीस आम्ही आव्हान स्वीकारले आहे. ते आम्ही करुन दाखवणार आहोत. आमच्यावर टीका होत आहे. मात्र आपण त्याचा विचार करीत नाही. आपल्याला जनतेचं भलं करून दाखवायच आहे आणि ते आपण करणार आहोत. आम्हाला कंत्राटी मुख्यमंत्री म्हटलं जातयं, होय आम्ही कंत्राट घेतलं आहे, विकासच आणि जनतेला न्याय देण्याचं, अशा शब्दात शिंदेंनी आपलं मत स्पष्ट केलं.

नवाब मलिक यांचं नाव न घेता शिंदे म्हणाले की, आघाडी सरकारमध्ये मुंबई बॉम्ब स्फोट घडविणाऱ्या दाऊदचा हस्तक एक मंत्री असल्याचे दिसून आले. त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता आणि आम्हाला मोदींचा हस्तक म्हणतात, दाऊद पेक्षा मोदींचा हस्तक झालेले चांगले. आपण सत्तेसाठी कोणतीही तडजोड केली नाही. ज्यांनी 25 वर्षे युती टिकवली, त्यांच्याशी युती करायची नाही तर कुणाशी करायची? त्यामुळे आम्ही बाळासाहेबांच्या विचार पुढे नेत आहोत, अशा शब्दात शिंदेंनी विरोधकांना सुनावले.

Eknath Shinde Latest News
'आधीचे एकनाथ तुमच्या मागे लागले, पण तुमचा एकनाथ पुढे घेऊन जाणारा'

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले की, खडसेंनी या ठिकाणी एकाधिकार शाही निर्माण केली होती. मात्र ती आता चंद्रकांत पाटील यांनी संपवून टाकली आहे. तो एकनाथ जरी चंद्रकांत यांना त्रास देत असला तरी हा एकनाथ त्यांच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. यावेळी गिरीश महाजन यांनी देखील खडसेंवर टीका केली, ते म्हणाले की, मी मी म्हणणाऱ्याचा वध झाला. रावनाचा, नरकासुराचा वध झाला. त्यामुळे त्यांचे दिवस संपले आहे. आता आपले दिवस आले आहेत,असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com