Nashik Graduate Constituency : कट्टर राजकीय विरोधक सत्यजीत तांबे अन् शुभांगी पाटील आले आमने-सामने; पण...

Satyajeet Tambe : सत्यजीत तांबे लग्न मंडपातून बाहेर पडत असताना शुभांगी पाटील आल्या अन्...
Satyajit Tambe and Shubhangi Patil
Satyajit Tambe and Shubhangi Patil Sarkarnama

Nashik Politics : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज वेगवेगळे ट्विस्ट समोर येत आहेत. असे असतानाच आज नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील हे आमने-सामने आले असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यावेळी दोघांनीही एकमेकांकडे पाहिले सुद्धा नाही. त्यामुळे एकच चर्चां रंगली आहे.

माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांचे चिरंजीव उदयन गडाख आणि राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार चंद्रशेखर घुले (Chandrasekhar Ghule) यांच्या कन्या डॉ.निवेदिता घुले यांचा आज विवाह सोहळा नेवासा तालुक्यातील सोनई येथे संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला शुभांगी पाटील आणि सत्यजीत तांबे या दोन्ही उमेदवारांनी हजेरी लावली.

Satyajit Tambe and Shubhangi Patil
Shubhangi Patil : 'राजा का बेटा राजा नही बनेगा' म्हणत, तांबेंना आव्हान देणाऱ्या शुभांगी पाटील कोण आहेत?

यावेळी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) हे लग्न मंडपातून बाहेर पडत होते. त्याच दरम्यान अचानक समोरून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील आल्या. त्यामुळे दोघे उमेदवार अचानक आमने-सामने आले. मात्र, यावेळी दोघांनी देखील एकमेकांकडे पाहिले सुद्धा नाही. तर या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून दोघांनी देखील विविध पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

तसेच शिक्षक संस्था चालकांच्या आणि विविध मतदारांच्या भेटी घेत आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी दोघांनीही वधू - वरांना शुभेच्छा दिल्या. मात्र, आपल्याला मतदान करावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी माध्यमांशी संवादही साधला.

Satyajit Tambe and Shubhangi Patil
Gadakh and Ghule : नगरमध्ये नव्या राजकारणाची नांदी; गडाख-घुले झाले व्याही-व्याही

त्या म्हणाल्या, ''माझा विजय होणार आहे, त्यामुळे मला कसलीही भिती नाही. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सर्व नेते आमच्या बरोबर आहेत. विवाह सोहळ्यास येण्यास उशीर झाला. पण आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) बैठक घेत संस्था चालकांनाही याबाबत सुचना केल्या आहेत. त्यामुळे माझ्या सोबत सर्वांचा आशीर्वाद आहे'', असं त्या म्हणाल्या.

''तसेच यावेळी भाजपच्या आमदार मोनिका राजळे (Monica Rajle) यांची देखील भेट झाली. नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये मी एकमेव महिला उमेदवार आहे, त्यामुळे त्यांनाही मदतीची विनंती केली असून त्याही माझ्या विनंतीला मान देतील'', असं शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यावेळी म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com