Malegaon APMC : दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे गटात पेटले सुडाचे राजकारण!

पालकमंत्री दादा भुसेंची दहा वर्षांची सत्ता राखण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली
Dada Bhuse & Adway Hire
Dada Bhuse & Adway HireSarkarnama

Dada bhuse v/s Adway Hire : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते, पालकमंत्री दादा भुसे आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) उपनेते या पारंपारीक विरोधकांत बाजार समितीच्या निवडणुकीची लढाई अगदी टोकाला गेली आहे. नुकतेच हिरे यांच्या आप्तस्वकीयांच्या विरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत सुडाचे राजकारण रंगल्याची चर्चा आहे. (Three Difrent FIR file against Hire family during electon)

मालेगाव (Malegaon) बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC election) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि शिवसेना (Shivsena) उपनेते अद्वय हिरे (Adway Hiray) यांच्यात राजकारण तापले आहे. आरोप, प्रत्यारोपांवरून थेट सुडाचे राजकारण रंगल्याची चर्चा सुरु झाल्याने दादा भुसे यांच्यासाठी गेली दहा वर्षे ताब्यात असलेली बाजार समिती वाचविणे प्रतिष्ठेचे बनले आहे.

Dada Bhuse & Adway Hire
Narendra Darade : भुजबळसाहेब, १५ कोटी घेतले, एक रुपया तरी परत केला का?

या निवडणुकीच्या तोंडावर हिरे यांच्याशी संबंधीतांवर तीन वेगवेगळे गुन्हे पोलिसांत दाखल झाले. यातील विषय जुने आहेत. त्यामुळे श्री. हिरे यांनी याबाबत थेट विरोधकांवर आरोप करीत `आम्हाला तुरूंगात टाकून निवडणुकीचे राजकारण करणार आहेत काय?. तसे असल्यास आम्ही त्यालाही पुर्ण ताकदीने सामोरे जाऊ, मात्र जनतेसाठी बाजार समितीत परिवर्तन करून दाखवू` असे म्हटले आहे.

हिरे यांचा रोख राजकीय विरोधक व पालकमंत्री दादा भुसे आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज आहे. मात्र गेली वीस वर्षे आमदार, दहा वर्षे बाजार समितीत सत्ता दादा भुसे यांच्याकडे आहे. अशा स्थितीत त्यांनी जर ही प्रकरणे खरी असतील तर त्याबाबत तक्रारदारांना यापुर्वीच न्याय का दिला नाही? असा पडतो. त्यामुळे सध्या तरी शेवटच्या टप्प्यात मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत सुडाचे राजकार रंगल्याची चर्चा आहेत.

Dada Bhuse & Adway Hire
Chhagan Bhujbal On Darade : आमदार दराडे यांनी स्वतः उमेदवारी का नाही केली?

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी ४६ उमेदवार आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांचे ‘आपलं’ पॅनल आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील ‘कर्मवीर भाऊसाहेब हिरे’ पॅनल आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांनी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना प्राधान्य क्रमानुसार चिन्ह वाटप केले. आपलं पॅनलने सर्व १८ जागांवर तर कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलने व्यापारी व हमाल मापारी गट वगळता १५ जागांवर उमेदवार दिले आहेत. १३ अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत.

बाजार समिती निवडणुकीच्या नऊ गटांपैकी सहकारी संस्था महिला राखीव, सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग व ग्रामपंचायत सर्वसाधरण अशा तीन गटात सरळ लढत होत आहेत. सहकारी संस्था महिला राखीव गटातील दोन जागांसाठी आपलं पॅनलचे उमेदवार असे, भावना निकम, शोभाबाई पवार (महिला राखीव), चंद्रकांत शेवाळे (इतर मागास प्रवर्ग), राजेंद्र पवार, कृष्णराव ठाकरे (ग्रामपंचायत), कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलचे उमेदवार असे, मिनाक्षी देवरे, भारती बोरसे, युवराज गोलाईत (इतर मागास प्रवर्ग), रवींद्र सूर्यवंशी, रत्ना पगार (ग्रामपंचायत) हे प्रमुख उमेदवार आहेत.

Dada Bhuse & Adway Hire
Jalgaon Politics: उद्धव ठाकरेंची पाठ फिरताच आमदार किशोर पाटील जागे झाले!

सहकारी संस्था सर्वसाधारण गटात पाच अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. सहकारी संस्था भटक्या विमुक्त जाती जमाती गटात महेश शेरेकर, ग्रामपंचायत गटातील अनुसूचित जाती जमाती गटात मोतीराम वानखेडे, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक गटात नारायण कळमकर, व्यापारी गटात रौफ खान, सुरेश झाल्टे, प्रवीण पाटील, हमाल मापारी गटात रवींद्र साळुंके व किसन वाघ हे अपक्ष उमेदवार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com