Gadakh and Ghule : नगरमध्ये नव्या राजकारणाची नांदी; गडाख-घुले झाले व्याही-व्याही

Ahmednagar Politics : उदयन गडाख आणि डॉ.निवेदिता घुले यांचा विवाह सोहळा संपन्न झाला
Gadakh and Ghule
Gadakh and GhuleSarkarnama

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील गडाख आणि घुले परिवाराचा एकेकाळी राजकीय संघर्ष असायचा. पण आता हे दोन्ही परिवार व्याही-व्याही झाले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात येणाऱ्या काळात नव्या राजकारणाची नांदी पाहायला मिळू शकते.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे नातू आणि माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांचे चिरंजीव उदयन गडाख आणि राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार चंद्रशेखर घुले (Chandrasekhar Ghule) यांच्या कन्या डॉ.निवेदिता घुले यांचा आज विवाह सोहळा संपन्न झाला.

Gadakh and Ghule
Udayan Gadakh wedding ceremony : शिवसेनेच्या पडझडीतही एकनिष्ठ राहणाऱ्या गडाखांच्या लग्नाला आदित्य ठाकरेंची नार्वेकरांसह हजेरी

या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार आशुतोष काळे, आमदार मोनिका राजळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Gadakh and Ghule
Shivshakti-Bhimshakti Alliance : शिवशक्ती-भिमशक्ती युतीचे राष्ट्रवादीचा हिरवा कंदिल; जितेंद्र आव्हाड म्हणतात...

गडाख आणि घुले परिवाराचे शेजारी-शेजारी साखर कारखाने आहेत. त्यामुळे दोन्ही परिवार स्थानिक निवडणुकीत नेहमी आमने-सामने यायचे. त्यामुळे गडाख आणि घुले परिवाराचा नेहमी राजकीय संघर्ष असायचा. स्थानिक निवडणुकीत एकमेकांसमोर लढणारी ही दोन घराणी आता व्याही-व्याही झाले आहेत.

Gadakh and Ghule
Marathwada Teacher Constituency : भाजपची उमेदवारी किरण पाटलांना, पण प्रतिष्ठा पणाला लागली बावनकुळेंची..

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्याच सोयऱ्या धायऱ्यांचे राजकारण पाहायला मिळतं. त्यातच आता पुन्हा एकदा गडाख आणि घुले परिवाराची सोयरिक तयार झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळाच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com