जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय चुकीचा; खडसेंनी सांगितला भाजपमधला अनुभव

Shinde- Fadanvis Government| मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच व नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे
 Eknath Khadase
Eknath Khadase

जळगाव : शिंदे सरकारने ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णय बदलण्याचा धडाका सरकारने सुरूच ठेवला आहे. गुरुवारी (१४ जुलै) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन निर्णय बदलण्यात आले आहेत. त्यानुसार सरपंच व नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पण शिंदे लोकांमधून सरपंच निवडणे हे अत्यंच चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी व्यक्त केले आहे.

भाजपमध्ये असतानाच आम्ही या अडचणीला सामोरं गेलो होतो, असा खुलासाच एकनाथ खडसे यांनी स्वत:च केला आहे. एकनाथ खडसे म्हणाले, 'जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय योग्य नाही. मी स्वत: हा अनुभव घेतला आहे. लोकांमधून सरपंच आणि नगराध्यक्षांची निवडणूक घेणे चुकीचे आहे. 2020 मध्ये मी भाजपमध्ये असताना नगराध्यक्ष निवडणुकीत आमचा उमेदवार निवडून आणला होता. जळगाव महापालिकेत भाजपचा लोकनियुक्त सरपंच आम्ही निवडून आणला. पण त्यावेळी पाच वर्षांचा जो काही काळ होता तो अत्यंत विचित्र गेला. तेव्हा इतर सदस्य वेगळा निर्णय घ्यायचे आणि नगराध्यक्षांचा निर्णय हा वेगळा असायचा. नगराध्यक्षाने एक निर्णय घेतला तर इतर सदस्य त्याला विरोध करायचे.''

 Eknath Khadase
Beed : आमदार धस विकासाला लागलेली कीड; आजबेंचा आरोप

'मुक्ताईनगरमध्ये भाजपचा नगराध्यक्ष होता, तोपर्यंत सर्व ठीक होतं. पण नंतर काहींनी पक्ष बदलला आणि काही लोक दुसऱ्या पक्षात गेले. त्यामुळे भूमिकाही बदलल्या आणि प्रशासनात निर्णय घेण्यास अडचणी निर्माण झाल्या, असंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

लोकांमधून सरपंचाची निवडणूक झाली तर सदस्य आणि त्यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता असते. सरपंचाला कोणतेही अधिकारा राहत नाही. त्यामुळे लोकांमधून सरपंच निवडण्याचा हा निर्णय घेणे चुकीचे असल्याचे खडसेंनी म्हटलं आहे. एकतर नगराध्यक्षाला आणि सरपंचाला काही विशेष अधिकार दिले तरच तो काम करू शकतो. पण अधिकारच नसतील तर त्याला बहुमतावरच त्याला अवलंबवून राहावे लागते, यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यापेक्षा पूर्वीची जी पद्धत योग्य होती, असंही खडसेंनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com