Ahmednagar NCP Politics : नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस भवनातील पाट्यांची तोडफोड भोवली; अजित पवार गटाकडून तक्रार दाखल

Sharad Pawar & Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात कार्यालयावरुन घमासान सुरू
Ahmednagar NCP Politics
Ahmednagar NCP PoliticsSarkarnama

Ahmednagar : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का देत त्यांच्या विरोधात राहण्याची भूमिका घेतली. अजित पवारांच्या निर्णयाने शिवसेनेनंतर खरी राष्ट्रवादी कोणाची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचवेळी नगरमध्ये दोन्ही गटात कार्यालयावरुन घमासान सुरू झाले आहे.

नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनावर शरद पवार (Sharad Pawar)गटाने ताबा घेताच याबद्दल आक्षेप घेत अजित पवार गटाचे जिल्हा शहराध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांनी कार्यालयातील जुन्या पदाधिकाऱ्यांच्या (अजित पवार गट) नामफलकांची (नेमप्लेट) तोडफोड केल्याचा आरोप करत थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अजित पवार गटाच्या तक्रारीवर कोतवाली पोलिसांनी शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagar NCP Politics
Sharad Pawar On Mushrif : कोल्हापुरात जाऊन पवारांनी मुश्रीफांचा हिशेब चुकता केला; म्हणाले, '' ईडीच्या नोटिशीला सामोरे जाण्याची ताकद...''

नगर शहरात पुणे रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस भवन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्याशी संबंधित वेलफेअर ट्रस्टअंतर्गत ही वास्तू असल्याने आणि शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित कळमकर यांना वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचनेनुसार त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनाचा ताबा घेत नूतन पदाधिकाऱ्यांचे नामफलक लावले. कळमकर यांनी या बद्दल सांगितले की, जुन्या पदाधिकाऱ्यांचे नामफलक हे पूर्वीच काढण्यात आले आहेत. हे फलक कार्यालयात काढून ठेवलेले असल्याचे समजते.

मात्र कळमकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनात येत पदाधिकाऱ्यांच्या(अजित पवार गट) पाट्यांची तोडफोड केली अशी तक्रार अजित पवार(Ajit Pawar) गटाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांनी केली आहे.

Ahmednagar NCP Politics
Ajit Pawar News : 'चंद्रकांत' नव्हे 'चांद्रयान'; दिलगिरी व्यक्त करीत अजितदादा म्हणाले...

त्यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात कलम 427 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विधाते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com