भाजप मनुस्मृती मानणारा पक्ष; सत्ताकाळात मुंडे, खडसेंना बाजूला केले...

भाजपा हा खरा जातीवादी पक्ष असून ओबीसी समाजाच्या मागे कधीही उभा राहणार नाही.
भाजप मनुस्मृती मानणारा पक्ष; सत्ताकाळात मुंडे, खडसेंना बाजूला केले...
Mehboob SheikhSarkarnama

नाशिक : मनसे (MNS) ही मोदी नकलाकार सेना असून ती भाजपाची (BJP) सी टीम आहे. भाजपा हा खरा जातीवादी पक्ष असून मनुस्मृती मानणारा पक्ष आहे. गोपीनाथ मुंडे, (Gopinath Munde) एकनाथ खडसे (Eknath Khadse) या नेत्यांनी पक्ष वाढीसाठी जीवाचे रान केले. त्यांना मात्र, सत्ताकाळात बाजूवा सारून मुख्यमंत्री वेगळ्याच व्यक्तीला केले गेले. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Sheikh) यांनी केली. ते राष्ट्रवादी भवन येथे 'शरद युवा संवाद यात्रा' प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे आयोजन युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केले होते. यावेळी त्यांनी आपल्या कार्याचा आढावा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून 'शरद युवा संवाद यात्रा' आयोजित करण्यात आली. या यात्रेच्या दुसऱ्या पर्वाची सुरवात नाशिक येथून करण्यात आली.

Mehboob Sheikh
राजकारण तापलं! डिस्चार्जनंतर राणा दाम्पत्य ठाकरे सरकारला थेट दिल्लीतून अडचणीत आणणार?

सर्वसामान्य नागरिकांसह पक्षातील कार्यकर्त्याला मंत्रालयाची पायरी चढायला लागू नये, याकरिता मंत्रालयातून इतर कामकाज होण्यापेक्षा प्रत्येक दिवशी तीन मंत्री राष्ट्रवादी पक्ष कार्यलयात बसवून सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबार सुरु केला. असा उपक्रम करणारा राष्ट्रवादी हा पहिलाच पक्ष आहे. ७० वर्षात भारत विकासाच्या दृष्टीने काहीच कामे झाली नाही. कपडे घालण्याचा शोध सुद्धा २०१४ सालानंतर लागल्याची हास्यास्पद टीका यावेळी मेहबूब शेख यांनी केली. भारतात रस्ते, नाले, वीज या सारखे विकासाचे काम झाले, भारत सक्षम होण्यास महत्वाचे पाउल उचलले गेले. त्यावर लक्ष केंद्रित न करता विकास कसा खुटला हे सोशल मिडीयावर पसरवले जात आहे, अशी टीका शेख यांनी केली.

शेख म्हणाले, मनसे ही भाजपाची सी टीम असून तिला मोदी नकलाकार सेना असे बोलणे वावगे ठरणार नाही. मनसेची सभा ही सुपारी सभा असते. या सभेत फक्त पवारांवर टीका होत असते. पवारांवर जातीयवादी असल्याचा आरोप करण्यात येतो. जर ते जातीवादी असते तर रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबडेकर या सारख्या नेत्यांना आमदार-खासदार केले नसते. सर्वत्र टीका होत असताना मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच नाव दिले नसते, असे शेख यांनी भाजपला सुनावले.

Mehboob Sheikh
अन् कोल्हापूर 100 सेकंदासाठी स्तब्ध झालं...

भाजपा हा खरा जातीवादी पक्ष असून एकनाथ खडसे व गोपीनाथ मुंडे या नेत्यांनी पक्ष वाढीसाठी जीवाचे रान केले. ४० वर्षापर्यंत चांद्यापासून बांध्यापर्यंत त्यांनी पक्ष वाढवला. परंतु सत्तेच्या काळात त्यांना बाजूला सारून मुख्यमंत्री वेगळ्याच व्यक्तीला केले. यानंतर एकनाथ खडसेच्या कुटुंबावर ईडीची नोटीस पाठवण्याचे काम केले. २०१४ सालानंतर सुडाचे व द्वेषाचे राजकारणास सुरुवार झाल्याची टीकाही शेख यांनी केली.

भाजपा हा मनुस्मृती मानणारा पक्ष असून हा पक्ष ओबीसी समाजाच्या मागे कधीही उभा राहणार नाही. त्यामुळे भोंग्याच्या मुद्दे व पवार यांच्यावर बोलण्यापेक्षा महागाई व भाववाढीवर बोलण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला. यावेळी दिंडोरी लोकसभा अध्यक्ष रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शादाब सैय्यद, चेतन कासव, जय कोतवाल, राहुल तुपे, सोनू वायकर, संतोष जगताप, सागर बेदरकर, निलेश भंदुरे, विशाल डोखे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.