...यामुळेच दीपक पांडेंना शासनाने दोन वेळा निलंबित केले!

महसूल अधिकारी कर्मचारी संघटनेने चार पानी निवेदनात दीपक पांडे यांच्यावर अनेक आरोप केले.
Revenue employees & Deepak Pande
Revenue employees & Deepak Pande Sarkarnama

नाशिक : पोलिस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pande) यांची कारकिर्द अतिशय वादग्रस्त आहे. ते अकोला (Akola) येथे जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर असताना तेथील सेक्स स्कँडल प्रकरणात त्यांच्या भूमिकेवरून शासनाने त्यांना निलंबिंत केले होते. आतापर्यंत त्यांच्या वर्तनावरून दोन वेळा निलंबित केले होते, असे विधान महसूल कर्मचारी (Revenue Officers) व अधिकारी संघटनेने निवेदनात केले आहे.

Revenue employees & Deepak Pande
दीपक पांडे माफी मागा... आक्रमक महसूल संघटनेचा इशारा !

महसूल यंत्रणेत विविध सुधारणा सुचविल्या. त्यात दीपक पांडे यांनी महसूल अधिकारी आरडीएक्स तर भूमाफीया डिटोनेटर असे संबोधले. हा उल्लेख महसूल यंत्रणेला चांगलाच जिव्हारी लागला. ही भाषा व वर्णन कोणत्याही शासकीय पत्रव्यवहाराचा भाग होऊच शकत नाही. त्यामुळे पांडेजी आम्हाला शहानपणा शिकवू नका. माफी मागा, असे संतापलेले कर्मचारी व अधिकारी म्हणतात. त्यांनी पांडे यांच्या कामकाजाविषयी अनेक तक्रारी केल्या आहेत.

Revenue employees & Deepak Pande
महाआघाडी सोडताना राजू शेट्टींचा जयंतराव, अजित पवारांवर गंभीर आरोप

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शासनाला दिलेले पत्र मागे घेत महसूल विभागातील अधिकाऱ्यांची बिनशर्त माफी मागावी, या मागणीसाठी विभागातील सर्व महसूलच्या अधिकारी, कर्मचारी यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची मंगळवारी भेट घेत श्री. पांडे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. जर १० एप्रिलपर्यंत पोलिस आयुक्तांवर कारवाई न झाल्यास ११ एप्रिलपासून विभागीय आयुक्त कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी अधिकारी संघटनेच्यावतीने देण्यात आला. या संदर्भात विभागीय आयुक्तांसह सचिवांना देखील निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महसूल अधिकारी हे आरडीएक्स तर दंडाधिकारी हे डिटोनेटर असून त्यांचे सर्व अधिकारी काढून घ्यावे, असे पत्र नाशिक शहर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलिस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांना सादर केले होते. हे पत्र सोशल मिडियावर प्रसारित होताच महसूल विभागात एकच खळबळ उडाली. यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील आपली नाराजी व्यक्त करत या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर श्री. पांडे यांनी महसूलमंत्री थोरात यांची बिनशर्त माफी मागत आपण दुखावले असल्यास दिलगिरी व्यक्त केली. मात्र मी माझ्यावर मतांवर ठाम असल्याचा देखील पुर्नउच्चार केला.

विभागातील सर्व महसूल अधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी यांनी पोलिस आयुक्त यांच्याविरुद्ध एकजूट होत विभागीय आयुक्त यांची भेट घेत श्री. पांडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले. यावेळी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त गमे यांच्याबरोबर चर्चा करीत पोलिस आयुक्त यांच्या पत्रामुळे महसूल विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. महसूल व पोलिस हे दोन्ही शासनाचे विभाग असून त्यांची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त यांनी आपले कार्यक्षेत्र सांभाळावे. महसूल अधिकाऱ्यांना विधीमंडळाने हे अधिकार प्रदान केले आहेत.

यावर श्री. गमे यांनी देखील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत पोलिस आयुक्त यांचे कार्यक्षेत्र वेगळे आहे. उपमुख्यमंत्री यांच्या नाशिक दौरा दरम्यान तीव्र स्वरूपाच्या तक्रारी समक्ष उपस्थित केलेल्या होत्या. त्यावेळीही उपमुख्यमंत्री यांनी सर्वाचे समोर पोलिस विभागाने काय कामे करावीत व काय करू नयेत याची आम्हाला चांगली जाणीव असून आपण याबाबत आम्हाला शिकवू नये, असे स्पष्ट भाषेत जाहीररीत्या बैठकीमध्ये सुनावले होते. तसेच उक्त प्रकरणात उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव गृह यांचे निर्देशानुसार विभागीय आयुक्त नाशिक यांनी याबाबत सर्व संबंधितांची बैठक घेतली. त्यात प्रत्येक विभागाच्या कामकाजाच्या जबाबदारीची जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी महसूलच्या विभागात ढवळाढवळ केली असल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाईची मागणी अधिकाऱ्यांनी केली.

यावेळी महसूल उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर, उपायुक्त रमेश काळे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आदींसह विभागातील प्रांताधिकारी, तहसीलदार हे उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com