ठाकरे विरुद्ध शिंदे समर्थकांची पोलिसांच्या सावधगिरीने टळली!

नाशिकच्या द्वारका चौकात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांसह खासदार हेमंत गोडसे सहभागी झाले.
Hemant Godse News, Nashik Latest Marathi News, Shivsena News
Hemant Godse News, Nashik Latest Marathi News, Shivsena NewsSarkarnama

नाशिक : बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात रविवारी शहरात शिवसेनेचे (Shivsena) शक्तीप्रदर्शन झाले. नंतर शहरातील (Nashik) शिंदे समर्थक मंगळवारी द्वारका चौकात शक्तिप्रदर्शन करतील अशी चर्चा होती. पोलिसांनी देखील परवानगी नाकारली. त्याची कुणकुण लागल्याने त्याला जशास तसे उत्तर देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थक शिवसैनिकांनी धाव घेतली होती. (Uddhav Thakre loyalist upset after police prohibition)

Hemant Godse News, Nashik Latest Marathi News, Shivsena News
शिवसेनेचे बंडखोर सरकार पाडणार अन् अमरिशभाई, रावल मंत्री होणार!

पोलिसांनी दोघांनाही परवानगी नाकारल्याने आंदोलनाच्या तलवारी म्यान करण्यात आल्या. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेतील राजकीय भूकंपाने वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात ठिकठिकाणी दोन्हींच्या समर्थकांत जोरदार घमासान सुरू आहे.(Nashik Latest Marathi News)

Hemant Godse News, Nashik Latest Marathi News, Shivsena News
बंडखोरांना चर्चेचा प्रस्ताव देण्याची पद्धत नसलेली शिवसेना मवाळ कशी झाली?

सुरतहून बंडाचा शंखनाद केल्यानंतर समर्थक आमदारांचा ताफा घेऊन शिंदे यांनी गुवाहाटी गाठले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून शक्तिप्रदर्शन सुरू झाले. रविवारी नाशिकमध्ये शिवसेनेने अमरधामपर्यंत रॅली काढून ठाकरे समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे समर्थकांनी पोस्टरबाजी केली. त्यांच्या पोस्टरला काही शिवसैनिकांनी काळे फासून विरोध केला. सोमवारी शिंदे समर्थक व शिवसेनेच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख योगेश म्हस्के तसेच सुजित जिरापुरे यांनी कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला.

मालेगावमधील दादा भुसे समर्थकांनीही शक्तिप्रदर्शनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सकाळी अकराच्या सुमारास द्वारका येथे शिंदे समर्थकांना पोलिसांनी अडविले. परवानगी नसल्याचे तसेच जमावबंदी लागू असल्याचे कारण देत शक्तिप्रदर्शन न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शिंदे समर्थकांनी तेथून काढता पाय घेतला.

खासदारांना परवानगी नाकारली

द्वारका चौकात शिंदे समर्थक शक्तिप्रदर्शन करणार असल्याची कुणकुण शिवसैनिकांना लागल्यानंतर जशासतसे उत्तर देण्यासाठी शिवसेनेची मोठी फौज द्वारका चौकात जमा झाली. खासदार हेमंत गोडसे हेदेखील त्यात सहभागी झाले. विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, योगेश बेलदार, अमोल सूर्यवंशी, उपमहानगरप्रमुख राहुल दराडे, महानगर संघटक आजिम सय्यद, सचिन बांडे, वैभव ठाकरे, गोविंद कांकरिया, स्वप्नील जाधव, गोरख वाघ, रितेश साळवे आदींनी ठाकरे समर्थनार्थ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्यांनाही परवानगी नाकारली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com