ठाकरे गटाच्या प्रकाश वाजेंच्या वाढदिवसाला दादा भुसेंची साखरपेरणी चर्चेत

ज्येष्ठ नेते प्रकाश वाजेंच्या ८१ वाढदिवसाला शिंदे गटाचे मंत्री दादा भुसेंच्या हस्ते झाला सत्कार.
DadaBhuse
DadaBhuseSarkarnama

सिन्नर : उद्धव ठाकरे गटाचे (Uddhav Thackrey) एकनीष्ठ नेते, माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांचे पिताश्री व तालुक्याच्या (Sinner) राजकारणात मोठे स्थान असलेले प्रकाश वाजे (Prakash Waje) यांचा ८१ वा वाढदिवस उत्साहात झाला. यावेळी विविध पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली मात्र एकनाथ शिंदे गटाचे (Eknath shinde group) व पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांची उपस्थिती चर्चेत आहे. दादा भुसे यांनी वाजे कुटुंबियांची स्तुती करीत साखरपेरणी तर केली नाही ना?. त्यात तथ्य असो वा नसो मात्र अशी चर्चा सुरु झाली. (Guardian minster Dada Bhuse praise Waje family`s Social contribution)

DadaBhuse
शिवसेनेचा आरोप, महापालिका अभियंत्याने घेतले अडीच लाख!

प्रकाश वाजे यांनी तालुक्यातील मंदिरांचा जीर्णोद्धार करत त्यांचे रुप बदलले. आपल्या दातृत्वातून शाळेसाठी जमीन देऊन अनेक पिढ्या घडवण्यासाठी मोठे कार्य केले. त्यांचे हे कार्य उच्च कोटीचे आहेत. त्यांनी आपल्या जीवनात थोर मोठ्या व्यक्ती यांच्याशी मैत्रीचा धागा संस्काराने व पुस्तकांच्या शिदोरीने घट्ट केला असून त्यांचे समाजकार्य खूप मोठे ते माझ्यासह कार्यकर्ते यांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

DadaBhuse
नाशिकला आक्रमक शिवसेनेची चक्क गांधीगिरी

ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांचा ८१ व्या अभीष्टचिंतन सोहळा येथील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युवराज छत्रपती संभाजीराजे, रोहिणी वाजे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, दीप्ती वाजे आदी उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले, की प्रकाश वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह इतर महापुरुषांचे पुतळे उभे राहिले. त्यांचे हे पवित्र कार्य सर्वांसाठी प्रेरणा देणारेच आहे. भाऊ स्पष्ट वक्ते असून आजही ते आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे हे ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन समाजसेवा करत आहे.

युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी देखील मनोगत व्यक्त करत प्रकाश वाजे यांचा माझ्या हस्ते सत्कार होणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. हा मान माझा नसून छत्रपतींच्या घराण्याचा आहे. कै. शंकरराव यांचे संस्कार वाजे कुटुंबीयांवर झाले असून आजही राजाभाऊ यांच्या बोलण्यातून ते दिसतात. प्रकाश वाजे यांचा स्वाभिमान आजही टिकून आहे. त्यांची स्मरणशक्ती तरुणांना लाजवेल इतकी तल्लख आहे. प्रकाश वाजे चालते बोलते एक सुसंस्कृत पुस्तक आहे.

या वेळी अभीष्टचिंतन सोहळा समिती अध्यक्ष विवेक चांडक, यावेळी मविप्र संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, मविप्र माजी उपसभापती पंडितराव पिंगळे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र देशपांडे, मानसी वाजे, नारायण वाजे, भाऊसाहेब सांगळे, मनोज भगत, हेमंत वाजे, सोमनाथ वाघ, विजय जाधव, प्रमोद चोथवे, हेमंत नाईक, रोहित गुजराथी, संदीप खिंवसरा, राजेंद्र कुऱ्हाडे, किशोर अग्रवाल, उदय गोळेसर, संतोष खर्डे, माधवी पंडीत उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com