मुक्ताईनगरला ठाकरे-शिंदे गटात हाणामारी

घरावर हल्ल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा; संशयितांत नगरसेवकाचा समावेश
Uddhav Thackray- Eknath Shinde
Uddhav Thackray- Eknath ShindeSarkarnama

मुक्ताईनगर : राज्यात (Maharashtra) उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील राजकीय संघर्ष (Political conflict) शिगेला पोचला आहे. मुक्ताईनगरमध्ये (Muktainagar) या दोन्ही गटांमध्ये ठिणगी पडली. नगरसेवकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (FIR registered against Shinde group corporator in Muktainagar)

Uddhav Thackray- Eknath Shinde
`आरटीओ`चे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी लागेबांधे?

मुक्ताईनगरात मंगळवारी रात्री उशिरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला झाला. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास भाग्यश्री जैन कुटुंबीयांसह देवी विसर्जन मिरवणूक पाहात होत्या. शिंदे गटाचे नगरसेवक राजू हिवराळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जुन्या वादातून त्यांचे पती अजय जैन यांच्याशी हुज्जत घातली. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला.

Uddhav Thackray- Eknath Shinde
Chitra Wagh: `वरिष्ठ नेत्याने मला माझी जात विचारली होती`

रात्री सव्वाबाराच्या सुमारास राजू हिवराळे आणि इतरांनी अजय जैन यांच्या घराजवळ येऊन त्यांना शिवीगाळ केली. त्यांनी दगडफेक केली. यामुळे अजय जैन यांनी स्वरक्षणार्थ कुंडी फेकल्यानंतर त्यांनी पुन्हा जोराने दगडफेक केली. यामुळे जैन दांपत्य घरात गेले. त्यांनी रोहिणी खडसे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. थोड्या वेळाने पोलिस आल्यानंतर ते लोक निघून गेले.

दगडफेकीत अजय जैन यांच्या घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत भाग्यश्री जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगरसेवक राजेंद्र हिवराळे ऊर्फ राजू डॉन, बाळा चिंचोले व विकास जुमळे यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विकास जुमळे होमगार्डमध्ये कार्यरत आहेत.

दरम्यान, दोन्ही पक्षांना नवीन नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर संघर्षाचा पहिला फटाका मुक्ताईनगरात फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यांच्या घरावर हल्ला झाला ते अजय जैन पूर्वी कॉंग्रेसचे पदाधिकारी होते. अलीकडेच ते उद्धव ठाकरे यांच्या गटात दाखल झाले होते.

दुसऱ्या गटाकडूनही तक्रार

दुसऱ्या गटाकडून बाळा चिंचोले यांनी मंगळवारी रात्री उशिरा तक्रार दिली. त्यात म्हटले आहे, की संशयित अजय जैन, अमर जैन, आनंद जैन व अनिल जैन (पूर्ण नाव माहित नाही), तसेच इतर चार जणांनी सोमवारी (ता. १०) रात्री मंडळी जमवून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. यावरून संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस कर्मचारी मोहंमद तडवी तपास करीत आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com