जळगावमध्ये ठाकरेंची ताकद वाढली.. सुरेशदादा जैन यांचा जामीन मंजूर ; गुलाबरावांच टेन्शन वाढणार...

Suresh Jain : ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्यास जळगावच्या राजकारणात मोठा उलटफेर होईल.
Suresh Jain, Jalgaon Latest News
Suresh Jain, Jalgaon Latest NewsSarkarnama

जळगाव : घरकुल गैरव्यवहार प्रकरणात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाने नियमीत जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना राज्यात कुठेही जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ते आता जळगावतही येवू शकणार असल्याने त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेसोबत बंड केल्यानंतर जिल्ह्याचे विद्यमान पालमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे शिंदे गटात गेल्याने ठाकरे गट जिल्ह्यात कमजोर झाला होता. मात्र, सुरेशदादांना जामीन मिळाल्याने ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. (Suresh Jain, Jalgaon Latest News)

Suresh Jain, Jalgaon Latest News
Ajit Pawar : राजकारण पेटलं ; 'मविआ' तुलना औरंगजेबाशी ; अजितदादा संतापले, म्हणाले..

माजी आमदार सुरेशदादा जैन (Suresh Jain) यांना घरकुल गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने वैद्यकिय उपचारासाठी जामीन मंजूर केला होता. त्यामुळे ते मुंबईसोडून कोठेही जावू शकत नव्हते.ते आपल्या जळगाव मतदार संघातही आले नव्हते.आपल्याला नियमीत जामीन मंजूर करावा यासाठी सुरेशदादा जैन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने आज त्यांचा नियमीत जामीन मंजूर केला असल्याची माहिती महापालिकेतील शिवसेनेचे (Shivsena) गटनेते नितीन लढ्ढा यांनी दिली.

सुरेशदादा जैन यांना नियमीत जामीन मिळाल्याचे वृत्त येताच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या सतरा मजली इमारतीसमोर फटाके फोडून जल्लोष केला.महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे आदी यावेळी उपस्थित होते.

Suresh Jain, Jalgaon Latest News
Beautification of forts : प्रतापगड विकासाचा २०० कोटींचा आराखडा...

नियमीत जामीन मंजूर झाल्यामुळे सुरेशदादा जैन हे आता कुठेही फिरू शकतात, ते आता जळगाव येथेही लवकर येतील, असेही त्यांच्या निकटवर्तीयानी सांगितले. जैन यांचा जळगाव जिल्ह्याचे नव्हे तर राज्याच्या राजकारणात एक वेगळा दबदबा होता. जळगाव विधानसभा मतदार संघातून सलग नऊ वेळा ते निवडून आले होते. सन १९८५ पासून जळगाव पालिकेवर त्यांचे तब्बल ३० वर्षे वर्चस्व होते.

Suresh Jain, Jalgaon Latest News
सुनबाई विरोधात सासरे मैदानात; जडेजाच्या वडीलांकडूनच कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन

आताही त्यांच्या नेतृत्वाखालील जळगाव महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. या शिवाय सहकार क्षेत्रातही त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते,जळगाव जिल्हा बँकेचे ते चेअरमनपदही त्यांनी भूषविले आहे. जळगाव नगरपालिकेच्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणी ते वैद्यकिय जमिनावर होते, त्यामुळे ते पूर्णपणे राजकारणापासून अलिप्त आहेत. ते राजकारणापासून अलिप्त असले तरी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कट्टर समर्थकांनी सन २०१८ मध्ये जळगाव महापालिकेत शिवसेनेने निवडणूक लढविली, भाजपपुढे त्यांचा पराभव झाला. केवळ पंधरा जागा शिवसेनेला मिळाल्या. मात्र पुढे अडीच वर्षात भाजपचे नगरसेवक फुटले आणि त्यांनी शिवसेनेला पाठींबा दिला, शिवसेनेच्या जयश्री महाजन महापौर झाल्या. त्यामुळे आजही महापालिकेत सुरेशदादांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची सत्ता असल्याचे सांगण्यात येते.

सुरेशदादा राजकारणापासून अनेक वर्षे अलीप्त असल्यामुळे जळगावच्या राजकीय क्षेत्रात नेतृत्वाची मोठी पोकळी आहे. नियमीत जामीन मिळाल्यामुळे ते आता जळगावात येवू शकतात. मात्र राजकारणात पुन्हा सक्रिय व्हायचे की नाही, याबाबतचा संपूर्ण निर्णय त्यांच्याच मतावर अवंलबून आहे. मात्र त्यांचे कार्यकर्ते अद्यापही सुरेशदादा राजकीय क्षेत्रात पुन्हा पर्दापण करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्यास जळगावच्या राजकारणात मोठा उलटफेर होईल. हे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय तज्ज्ञाची गरज नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com