Jalgaon Politics: निष्ठावान नेत्याकडून ठाकरेंच्या गडाला सुरुंग; शेकडो पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

अजित पवार आणि एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
Jalgaon Politics:
Jalgaon Politics: Sarkarnama

Jalgaon Politics: राष्ट्रवादी कॉंग्रेसने जळगावात ठाकरेंचा गडाला सुरुंग लावला आहे. ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख आणि युवासेनेच्या जिल्हा समन्वयकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. (Thackeray group's Manohar Patil joins NCP along with hundreds of office bearers)

जळगावातील ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख डॉ. मनोहर पाटील आणि युवा सेनेचे जिल्हा समन्वयक विश्वजीत पाटील यांच्यासह ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

Jalgaon Politics:
Farmers news: ही जात नाही तर..; जातीच्या रकान्यावर कृषि विभागाने दिलं उत्तर

शिवसेनेचे निष्ठावान म्हणून डॉ. मनोहर पाटील ओळख आहे. १९९० मध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून मनोहर पाटील यांनी निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर १९९५ च्या निवडणुकीवेळी शिवसेनेची जामनेरची जागा भाजपने घेतली. तर भूसावळची भाजपची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली.तेव्हापासून डॉ. मनोहर पाटील यांना संधीच मिळाली नाही. त्यानंतरही पाटील नेहेमीच एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून राहिले. पण त्यांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या निर्णयाने एकच खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in