नाशिककरांची चिंता वाढली, शहरात आढळला आफ्रिकन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

दक्षिण आफ्रिकेच्या माली या देशातून तीन नागरिक नाशिकमध्ये व्यवसाय संदर्भात आले होते.
corona omicron veriant

corona omicron veriant

Sarkarnama

सिडको : नाशिक (Nashik) शहारातील सिडको भागातील एका हॉटेलमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेला नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Covid-19) आला आहे. यामुळे ओमिक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर नाशिककरांची चिंता वाढली आहे. महापालिका (NMC) सिडको वैदयकीय विभागाने संबंधित हॉटेलला भेट देऊन संपर्कात आलेल्या बारा कर्मचाऱ्यांचा आरटीपीसीआर (RTPCR) तपासणीसाठी पाठविला आहे.

<div class="paragraphs"><p>corona omicron veriant</p></div>
गड आला पण सिंह गेला! विधान परिषदेत भाजपला मोठा धक्का

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह आलेला नागरिक हा दक्षिण आफ्रिकेतून आलेला असल्याने नाशिककरांची चिंता चांगलीच वाढली असून, आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या माली या देशातून तीन नागरिक नाशिकमध्ये व्यवसाय संदर्भात आले होते. संबंधित नागरिक नागरिक हे सिडको परिसरातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.

<div class="paragraphs"><p>corona omicron veriant</p></div>
२४ तासात चार्जशीट, अन् ४८ तासात निकाल; विनयभंगातील आरोपीला शिक्षा

या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आल्यावर त्यापैकी एका नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, दोन नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पालिका सिडको वैदयकीय विभागाने याबाबत त्वरीत दखल घेतली. वैदयकीय अधिकारी डॉ. बाजी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर व कर्मचारी यांनी संबधीत हॉटेलला भेट दिली. संबधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 12 कर्मचाऱ्यांचा आरटीपीसीआर तपासणी साठी पाठविण्यात आला आहे. तसेच, संपर्कात आलेल्या नागरिकांचा आरोग्य विभागातर्फे शोध घेतला जात आहे. तसेच, जिनोम स्क्वेन्सिंगचा अहवालावरुन पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती डॉ. बाजी यांनी दिली आहे.

राज्यातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 28

दरम्यान ओमिक्रॉन रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आज (ता.14 डिसेंबर) 8 रूग्ण नव्याने सापडले आहेत. यामुळे ओमिक्रॉन रूग्णांची संख्या महाराष्ट्रातील संख्या ही 28 वर पोचली आहे. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये 3 महिला 5 पुरूषांचा समावेश आहे. 3 रूग्ण हे लक्षणे विरहित असून 5 रूग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली आहेत. विशेष म्हणजे या आठ रूग्णापैकी सात रूग्णांचे लसीकरण पुर्ण झाले होते. तर, एकाचे लसीकरण बाकी होते. देशात सर्वाधिक ओमिक्रॉन रूग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. यामध्ये 12 रूग्ण मुंबई, 10 पिंपरी-चिंचवड,1 वसई-विरार, पुणे 2, डोंबिवली 1, नागपूर 1 व लातूर येथे 1 रूग्ण आढळला आहे. आज आढळलेल्या रूग्णापैकी 7 रूग्ण हे मुंबई कर 1 रूग्ण वसई-विरार येथे आढळला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com