काँग्रेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांना ‘टीडीएफ’ने पुरस्कृत केले

पुणे येथे झालेल्या ‘टीडीएफ’च्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी डॅा. तांबे यांना उमेदवारी जाहीर केली.
Dr. Sudhir Tambe
Dr. Sudhir TambeSarkarnama

चोपडा : नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate constituency) आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडीने (National teachers democratic Front) (टीडीएफ) आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. (Graduate constituency election process is on in Nashik Division)

Dr. Sudhir Tambe
Chitra Wagh: `वरिष्ठ नेत्याने मला माझी जात विचारली होती`

नाशिक विभाग पदविधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॅा. तांबे यांना यापुर्वीच काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. आमदार तांबे यांनी विभागातील प्रमुख संस्था लोकप्रतिनिधींशी संपर्क करून प्रचार सुरु केला आहे.

Dr. Sudhir Tambe
Rohit Pawar: शासकीय यंत्रणाचा गैरवापरातून लोकशाहीची पायमल्ली!

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या (टीडीएफ) राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच पुणे येथे टीडीएफचे प्रदेशाध्यक्ष विजय बहाळकर यांच्या अध्यक्षतेखाली खाली झाली. या बैठकीत फेब्रुवारी २०२३ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर संघातून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला.

टीडीएफचे राज्य कार्यवाह हिरालाल पगडाल यांनी आमदार डॉ. तांबे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन महाराष्ट्र टीडीएफने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी पुरस्कृत करावी, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ माजी आमदार नानासाहेब बोरस्ते (नाशिक), संजय पवार (धुळे), राजेंद्र लांडे (अहमदनगर), भाऊसाहेब बाविस्कर (जळगाव), सुधीर काळे (नगर महानगर), जी. के. थोरात (पुणे) आदींनी माहिती दिली. प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली.

यावेळी टीडीएफचे उपाध्यक्ष हनुमंत भोसले, के. एम. ढोमसे, अरविंद कडलग, डी. जे. मराठे, सागर पाटील, मुरलीधर मांजरे, दत्तराज सोनावळे, किशोर जाधव, शिवाजी कामथे, सुशांत कविस्कर, आर. एच. बाविस्कर, संजय पवार यांच्यासह टीडीएफचे सर्व विभाग सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com